ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इसुदान गढवी हे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, अरविंद केजरीवाल यांनी केली घोषणा

दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने काल गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केले आहे. १८२ जागांच्या विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्याचवेळी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबत ८ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी इसुदान गढवी यांना ‘आप’ चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आहे.अहमदाबादमध्ये पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.

इसुदान गढवी यांचा जन्म १० जानेवारी १९८२ रोजी जामनगर जिल्ह्यातील पिपलिया गावात एका साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील खेराजभाई हे शेतकरी असून संपूर्ण कुटुंब शेती करते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!