ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसला जोरदार झटका, ज्येष्ठ नेते आणि आमदार मोहन सिंग राठवा यांनी दोन मुलांसमवेत भाजपात केला प्रवेश

गुजरात : गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. ज्येष्ठ नेते आणि आमदार मोहन सिंग राठवा यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदार पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांच्या मुलाला निवडणुकीत तिकीट देण्यास नकार दिला. म्हणूनच मोहनसिंग राठवा यांनी त्यांचे पुत्र राजेंद्र सिंह आणि रणजित सिंह यांच्यासहित भाजपमध्ये प्रवेश केला.

कांग्रेसचा राजीनामा दिल्या नंतर मोहन सिंह राठवा भाजप कार्यालयात पोहोचले आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस भार्गव भट्ट आणि प्रदीप सिंह वाघेला यांनी त्यांचा भाजपमध्ये समावेश केला. यावेळी राठवा यांचे पुत्र राजेंद्र सिंह आणि रणजित सिंह यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. आता तुम्हाला भाजपमध्ये तिकीट मिळणार का, असे त्यांना विचा रले असता राठवा यांनी याबाबत शंभरटक्के खात्री असल्याचा दावा केला

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!