ध्यास विश्वसार्ह बातमीचा

औचित्य जागतिक मधुमेह दिनाचे… डॉ. भास्कर पाटील डायबेटीस फूट केअरच्या वतीने रविवारी तपासणी व मार्गदर्शन शिबीर

सोलापूर,प्रतिनिधी : मधुमेह रोगाबाबत जनजागृती आणि त्यावर वेळीच योग्य उपचार व्हावे या उद्देशाने डॉ. भास्कर पाटील डायबेटीस फूट केअर आणि सोलापूर डायबेटीस केअर सेंटरच्या वतीने जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने रविवार दि. 13 नोव्हेंबर रोजी मधुमेह तपासणी आणि मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले अल्याची माहिती मधुमेह तज्ञ डॉ. भास्कर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भारतात प्रत्येक 10 व्यक्तीमागे 1 मधुमेहाचा रुग्ण आहे जवळपास साडेसात कोटी लोकांना मधुमेहाची लागण झालेली आहे येत्या दोन वर्षात म्हणजे सन 2024 पर्यत ही संख्या साडे तेरा कोटी पर्यत जाण्याची शक्यता आहे. ज्याला मधुमेह आहे त्याला कोणतातरी दुसरा आजार झाल्याशिवाय मधुमेह आपल्याला आहे याची माहितीच नसते म्हणून प्रत्येकाने वेळेवर आपल्या रक्ताची, शरीराची तपासणी करणे गरजेचे आहे. दि. 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो याच दिवसाचे औचित्य साधून डॉ. भास्कर पाटील डायबेटीस फूट केअर आणि सोलापूर डायबेटीस केअर सेंटर यांच्या वतीने मधुमेह तपासणी तसेच मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. भास्कर पाटील डायबेटीस फूट केअर आणि सोलापूर डायबेटीस केअर सेंटरच्या वतीने मधुमेह रुग्णांची संख्या कमी कशी करता येईल आणि ज्यांना मधुमेह झाला आहे त्यांच्यावर उपचार करून मधुमेह नियंत्रणात कसा आणता येईल यासाठी अनेकदा विविध उपक्रम राबविले जातात.

कोरोना काळात मधुमेह असलेल्या रुग्णांना अधिक धोका होता त्यावेळी अनेकांना उपचारासाठी बाहेर येता येत नव्हते त्यावेळी युट्युब चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने व्यायामाचे धडे दिले, वेळोवेळी मार्गदर्शन केले. मधुमेहाबाबतची जनजागृती व्हावी यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने रविवार दि. 13 नोव्हेंबर रोजी डॉ. भास्कर पाटील डायबेटीस फूट केअर आणि सोलापूर डायबेटीस केअर सेंटर मोदी रेल्वेलाईन यतीराज हॉटेल जवळ सोलापूर येथे सकाळी 10 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठा च्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते झाल्यापासून दिवसभर टाईप 1 आणि टाईप 2 या मधुमेह रुग्णांसाठी त्यांची रक्तातील साखर, रक्तदाब, वजन, उंची, बीएमआय, पायांची तपासणी करण्यात येणार आहे तसेच व्यायाम, योगासन, आहार व पाककलेचे मार्गदर्शन केले जाणार आहे यासाठी आहार तज्ञ मनाली काणे, ज्योती पाटील आणि योगासन बाबत धनंजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन होणार असल्याचे मधुमेह तज्ञ डॉ. भास्कर पाटील यांनी सांगितले.

या शिबीरात येणाऱ्या प्रत्येकासाठी चहा पाणी, नाष्टा आणि करमणुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही रुग्णांना बक्षिसही देण्यात येणार आहे. रविवार दि. 13 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या शिबीरासाठी दि. 11 नोव्हेंबर पर्यत 9822262120 या मोबाईलवर नांव नोंदणी करणे आवश्यक आहे. सोलापूर शहर जिल्हा तसेच सोलापूरच्या बाहेरील मधुमेह रुग्णांसाठी ही सुवर्णसंधी डॉ. भास्कर पाटील डायबेटीस फूट केअर आणि सोलापूर डायबेटीस केअर सेंटरच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे मधुमेह तपासणी आणि मार्गदर्शनासोबतच आपला आहार कसा असावा याचेही मार्गदर्शन यामध्ये करण्यात येणार आहे त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन डॉ. भास्कर पाटील डायबेटीस फूट केअर आणि सोलापूर डायबेटीस केअरच्या सीईओ डॉ. ज्योती भास्कर पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!