ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अरे बापरे…ज्वेलर्सच्या दुकानामधील ३१ कर्मचाऱ्यांना कोरोना ; ग्राहकांचा शोध सुरु

इंदोर : करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील सुमारे २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक देशांच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. भारतात मागील गेल्या काही महिन्यापासून कोरोना नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी टप्प्याने अनलॉक केले जात. दरम्यान, मध्य प्रदेशमधील इंदूर शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानामधील तब्बल ३१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इंदोरमधील आनंद ज्वेल्स या दुकानातील ३१ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दुकान बंद करण्यात आलं असून ते वेळोवेळी सॅनिटाइज करण्यात येत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दुकान पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.“करोनाचा संसर्ग झालेल्या दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास आम्ही सुरुवात केली आहे. मागील आठवड्याभरात या लोकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आम्ही घेत आहेत. या लोकांना सर्दी, खोकला, ताप यासारखी काही लक्षण दिसत असतील तर त्यांची करोना चाचणी केली जाणार आहे,” अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डॉ. प्रविण जाडिया यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली.

काही दिवसांपूर्वीच देशभरामध्ये दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या निमित्ताने अनेकांनी घराबाहेर पडत मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गोष्टींची खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी केल्याचे पहायला मिळालं. मागील काही महिन्यांच्या तुलनेत या महिन्यामध्ये अनेकजण घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आलं. दिल्ली, मुंबईसारख्या काही शहरांमध्ये तर गर्दीच्या ठिकाणीही अनेकजण मास्क न घालताच फिरत असल्याचेही दिसून आलं. अनेक ठिकाणी सरकारने घालून दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!