---Advertisement---

सुकेश चंद्रशेखरचा आणखी एक लेटर बॉम्ब, अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांना पॉलीग्राफ चाचणी करण्याचे दिले आव्हान

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्याविरोधात ठग सुकेशचा आणखी एक लेटर बॉम्ब समोर आला आहे. यामध्ये सुकेश चंद्रशेखर यांनी पॉलीग्राफ चाचणी करण्याचे आव्हान दिले असून सत्येंद्र जैन आणि केजरीवाल यांच्यावरील आरोपांबाबत माझी पॉलीग्राफ चाचणी करण्याच्या सूचनेचे मी स्वागत करतो, असे ठग सुकेशने म्हंटले आहे. सुकेश चंद्रशेखर यांनी केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्यासाठी दुबईतून करोडो रुपयांची घड्याळे आणली आणि भेट दिली असा आरोप केला आहे.

यासोबतच सुकेशने अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांना पॉलिग्राफ चाचणीचे आव्हानही दिली आहे. त्यांनीही यासाठी संमती द्यावी आणि त्यानंतर तिघांचीही एकत्रित चाचणी करावी, असे सुकेशने सांगितले. या चाचणीचे थेट प्रक्षेपण व्हावे, जेणेकरून अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांचे सत्य देशासमोर येऊ शकेल, असेही सुकेशने पत्रात म्हटले आहे


 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!