अक्कलकोट,दि.१४ : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे,काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष शितल म्हेत्रे, दुधनी मार्केट कमिटीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट येथे पदयात्रा संपन्न झाली. या पडयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.
सध्या महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा आहे. या यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी अक्कलकोटमधील शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्याची वातावरण निर्मिती व्हावी यासाठी सोमवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने अक्कलकोट शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीस काँग्रेस कार्यालय येथून सुरुवात होऊन बसस्थानक, कारंजा चौक, तूप चौक, सावरकर चौकसह शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली निघाली.
या रॅलीत अक्कलकोट शहरातील युवक युवती,वयोवृद्ध यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेससह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दिलीप सिध्दे, जेष्ठ नेते अशपाक बळोरगी, सद्दाम शेरीकर, काँग्रेस शहराध्यक्ष बसवराज अळ्ळोळी, काँग्रेस युवक अध्यक्ष बाबासाहेब पाटील, मैनूदिन कोरबू, सरफराज शेख, चंदन आडवीतोटे, माजी नगरसेवक रामचंद्र समाणे, सतीश चिंचोळी, नगरसेवक विकास मोरे, सुनील खवळे, शिवराज स्वामी, सिद्धार्थ गायकवाड, सिद्धाराम भंडारकवठे, शाकीर पटेल सायबण्णा गायकवाड, काँग्रेस महिला शहराध्यक्ष सुनीता हडलगी, सुनंदा भकरे, दिपाली आडवितोटे, राजनंदिनी कुंभार, शोभा इचगे, झाशी की राणी या वेशभूषेत संचिता हडलगी यासह मान्यवरांनी या यात्रेत सहभाग नोंदवून मोठ्या उत्साहात भारत जोडो, भारत जोडो, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.
शेवटी ए-वन चौक येथील स्मारकाजवळ येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला.यावेळी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष शितल म्हेत्रे यांनी रॅलीला संबोधताना म्हणाल्या की, जसे अक्कलकोटात मोठ्या संख्येने रॅलीत उपस्थित राहून राहुल गांधींना पाठिंबा दर्शविला त्याचप्रमाणे आपण बहुसंख्येने भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.