भारत जोडो यात्रेने मंगळवारी मराठवाड्यातून विदर्भात केला प्रवेश, राहुल गांधींच्या स्वागतासाठी कनेरगावाजवळ साकारली लाल किल्ल्याची प्रतिकृती
विदर्भ : कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेने मंगळवारी मराठवाड्यातून विदर्भात प्रवेश केला. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कनेरगावाजवळ लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारली होती.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेच्या निमित्ताने शेगावमध्ये राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी याबाबतचे संकेत दिले. शेगावमधील या सभेला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.