मुंबई : राज्यपाल भगतसिंग यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. राज्यपालांच्या या विधानामुळे राज्यात प्रचंड वादंग निर्माण झाले होते. यावर आज थेट छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या विरोधात रोखठोक भूमिका मांडली. यावेळी उदयनराजे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावरच आता उदयनराजे यांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या आहेत” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहेत.
छत्रपतींचे वंशज हे कधीच हतबल होऊ शकत नाहीत.
मी पुन्हा एकदा सांगतो आमच्या सगळ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा मोठा प्रेरणास्रोत दुसरा कोणी असूच शकत नाही. आमच्या सगळ्यांचे, महाराष्ट्राचे आणि देशाचे आदर्श तेच आहेत ! pic.twitter.com/FejJhuYc2O— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2022
उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या विरोधात भूमिका मांडली यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, उदयनराजे यांच्यापाठिशी आम्ही सगळे आहोत. छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यामुळे ते भावनेतून बोलले असले तरी महाराष्ट्र आणि देश त्यांच्या पाठिशी आहे. उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.