अक्कलकोट दि,३0- कारखानदारीतील दीपस्तंभ मानल्या गेलेल्या सोलापूरचा सिद्धेश्वर साखर कारखाना बंद पाडण्यासाठी काही विघ्न संतोषी प्रयत्नशील आहेत.सिद्धेश्वर कारखाना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जीवन वाहिनी असून ती बंद पाडण्याचा प्रयत्न झाल्यास गाठ आमच्याशी आहे. असा इशारा सोलापूर जिल्हा शेतकरी सुखाणू समितीचे अध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर यांनी दिले.
विमान वाहतूक चालू व्हावी ही सकारात्मक गोष्ट आहे.पण त्यासाठी कारखाना बंद पाडू हा वाईट विचार आहे.त्यामुळे असंख्य शेतकऱ्याचे संसार उध्वस्त होणार आहेत. सिद्धेश्वर कारखान्याने धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात ऊसाला सर्वाधिक भाव दिला आहे. त्याचे पोटसूळ काही शेतकऱ्यांच्या विरोधकात उठला आहे.त्यांनी वेगळ्या मार्गाने कारखाना बंद पाडण्याचा डाव चालवला आहे असेही हरवाळकर म्हणाले.
विमानतळ झाला तर फक्त छोटी विमाने च उडणार आहेत.मग एवढा अट्टाहास का ? बोरामणीला डोमेस्टिक विमानतळ प्रस्तावित आहे.त्यासाठी आंदोलन करा. नाहीतर अक्कलकोटला विमानतळ करा त्यामुळे कारखाना पण कायम राहील विमानतळ पण सुरू होईल असे शेतकरी सुधीर माळशेट्टी यांनी सांगितले. पन्नास हजार शेतकऱ्यांचा संसार सिद्धेश्वर कारखान्यावर अवलंबून असून ते बंद पाडण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्हाभर आम्ही जेलभरो आंदोलन करणार असे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अरुण जाधव यांनी सांगितले.
यावेळी शरण अल्लोळी, नागेश कोनापुरे, घुडूभाई मुजावर, मलवा बाके,सावित्री कोगनूर, यल्लमा प्याटी आदि ऊस उत्पादक शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांच्या मार्फत जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आल्या.