सोलापूर : शेतकऱ्यापर्यंत कृषी व पशुपक्षी विषयक नवनवीन तंत्रज्ञान पोचविण्यासाठी व कृषी उद्योग उत्पादने अवजारांची शेतकऱ्यांना माहिती मिळावी. त्याची प्रात्यक्षिक पाहता यावे .म्हणून श्री सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समिती व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे 29 डिसेंबर ते 2 जानेवारी असे पाच दिवस होम मैदानावरती आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सिद्धेश्वर मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेस सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते दरवर्षी सिद्धेश्वर यात्रेदरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. परंतु होम मैदानावर मर्यादित जागेत हे प्रदर्शन भरविण्यास अडचणी निर्माण होत होत्या. म्हणून यंदा यात्रेच्या पूर्वी ह्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
या प्रदर्शनामध्ये दुग्धोत्पादन, रेशीम पीक, मधुमक्षिका पालन ,वर्टीकल फार्मिंग, आधुनिक कृषी अवजारे, खते, औषधे ,बी- बियाणे, अवजारे ,यंत्रसामुग्री,, ट्रॅक्टर्स, फार्म इक्विपमेंट, सिंचन, फलोत्पादन ,पॅकेजिंग, व साठवणूक ,बायोटेक्नॉलॉजी, टिशू कल्चर, पाणी व्यवस्थापन, ऑटो फार्मिंग टेक्नॉलॉजी, सौरऊर्जा, पशुखाद्य व औषधे, डेरी इक्विपमेंट, पोल्ट्री सोल्युशन, कृषी अर्थसाह्य, लो बजेट हाऊसिंग सोल्युशन ,कृषी साहित्य, नियतकालिके अशा संस्थांचा सहभाग असणार आहे. या प्रदर्शनामध्ये 300 हून अधिक कंपन्यांचा समावेश असणार आहे.
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे ,फ्री फॅब्रिकेटेड, स्टॉल्स पिलरलेस डोम स्ट्रक्चर, कृषी तज्ञांच्या भेटी व मार्गदर्शन चर्चासत्र, विवध्येपूर्ण अवजारे आणि परदेशी भाजीपाला प्रदर्शन अशी वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये कोरडवाहू संशोधन केंद्र, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, आयसीएआर अंतर्गत राष्ट्रीय तृणधान्य कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, महाबीज, खादी ग्रामोद्योग, कृषी औद्योगिक आधारित कृषी स्टार्टअप ,फळ रोपवाटिका, कृषी महाविद्यालय, कृषी स्टार्टअप उद्योजक, नवा उद्योजक, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कुमटे व जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने ,राष्ट्रीयकृत व सहकारी बँकां ,नाबार्ड यांचा या कृषी प्रदर्शनात विशेष सहभाग असणार आहे.या कृषी प्रदर्शनाची तयारी स्मार्ट एक्सपो ग्रुप सांगलीचे संचालक सोमनाथ शेटे हे करत आहेत.
या प्रदर्शनाचे खास आकर्षण
दीड टन वजनाचा व एक कोटी रुपये किमतीचा गजेंद्र नावाचा रेडा असणार आहे यामध्ये 200 पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे ट्रॅक्टर व शेती अवजारे यांचे स्टॉल आहेत वाहन महोत्सव आहे शेतीविषयक प्रक्रिया उद्योग महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजनांची माहिती देणारी दालने सेंद्रिय शेतीचे विशेष दालन पशुपक्षी प्रदर्शन दुर्मिळ देशी 500 हून बियाणांचे प्रदर्शन व विक्री तांदूळ महोत्सव परदेशी भाजीपाला व कृषी तज्ञांची मार्गदर्शने दोन विषयक दालन सौर ऊर्जा विषयक सेपरेट झालं जगातील सर्वात लांब 15 इंच लांब गव्हाची लोंबी व 140 ते 50 दाणे तयार होणारी कुदरत 100 व आठ इंच लांबीची लोंबी ही देशी बियाणे ची माहिती व प्रदर्शन सेंद्रिय शेतीसाठी विशेष मार्गदर्शन गोड्या पाण्यातील मोत्याची शेती जगातील सर्वात लांब एक फूट लांबीची देशी मिरची फळे व फुले प्रदर्शन स्पर्धा गाय म्हैस व बैल प्रदर्शन आधी एकाच प्रदर्शनामध्ये उपलब्ध असणार आहेत.
होम मिनिस्टर फेम क्रांती मालेगावकर यांचा महाराष्ट्रात गाजत असलेला न्यू होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा, हा कार्यक्रम 31 डिसेंबर रोजी सायंकाळी साहा ते दहा वाजेप्रयेंत होम मैदान येथे संपन्न होणार आहे.या पत्रकार परिषदेस सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते