येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा काँग्रेसचा झेंडा फडकणार, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे प्रतिपादन
कुरनूर : काँग्रेसने देशाला खूप काही दिलेल आहे. गेल्या साठ वर्षांमध्ये काँग्रेसने देशाचा विकास केलेला आहे. ही जनता कधीही विसरत नाही. आणि आता परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा काँग्रेसला अक्कलकोट तालुक्यामध्ये जनतेने भरभरून प्रेम दिलेला आहे. जवळजवळ वीस पैकी 11 ग्रामपंचायत वर काँग्रेस वर्चस्व राहिलेलं आहे. त्यामुळे आता विकासाची जबाबदारी आमची आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. ते अक्कलकोट तालुक्यातील वीस ग्रामपंचायत च्या निवडणुकीच्या निकालानंतर बोलत होते.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा सुडाच राजकारण झालेला पाहायला मिळाला आहे. निधी देतो असे आमिष दाखवून विरोधकांनी आमच्या काही उमेदवारांना कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तसं न होता काँग्रेसवरच निष्ठा दाखवत आणि काँग्रेसची साथ न सोडता त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांचा विजय झाला. त्यामुळे पुन्हा एकदा अक्कलकोट तालुक्यामध्ये काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळाला आहे.आता अक्कलकोट तालुक्यात परिवर्तनाची लाट सुरु झालेली असून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला अशाच पद्धतीचे विजय हा काँग्रेसचा असेल यात काही शंका नाही असेही माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले.
परिवर्तनाची लाट सुरू…!
अक्कलकोट तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळाला आहे. यावरून लोकांना भाजपची हुकुमशाही समजली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा तालुक्यामध्ये काँग्रेस सरकार येणार आहे. हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती मध्येही विजय आपलाच असेल असे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत मध्ये विजय झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन युवा नेत्या शितल म्हेत्रे केले – शितल म्हेत्रे, काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष.