ग्रामपंचायत निवडणूक निकाल; अक्कलकोट तालुक्यात बारा गावात परिवर्तनाची लाट; सलगरमध्ये भाजपला तर बोरगाव (दे) मध्ये काँग्रेसला धक्का, शिरवळमध्ये नवे समीकरण
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यात रविवारी पार पडलेल्या २० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत अक्षर:शा परिवर्तनाची लाट उसळली आहे. या निवडणुकीत २० पैकी बारा गावात नवे कारभारी आले असून पाच गावात मात्र पुन्हा सत्ताधार्यांच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे. लक्षवेधी लढतीत सलगरमध्ये काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला असून या ठिकाणी गावकऱ्यांनी युवा नेतृत्वाला संधी दिली आहे तर बोरगाव (दे) येथे काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराची धोबीपछाड झाली असून भाजपने या ठिकाणी त्यांचा धुव्वा उडविला आहे.
रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ७९.३० टक्के मतदान झाले होते.या गावांची मतमोजणी सकाळी नऊ वाजता नवीन तहसील कार्यालयात सुरू झाली. दुपारी बारा वाजेपर्यंत या वीस गावांचे निकाल स्पष्ट झाले. निकाल स्पष्ट होताच विजयी उमेदवारांनी तहसीलच्या बाहेर गर्दी करत गुलालाची मुक्तपणे उधळत करित विजयी जल्लोष केला.
या निवडणुकीचा विचार केला तर बोरगाव दे, पालापूर, बोरेगाव, शिरवळवाडी, कोन्हाळी, रुददेवाडी, घोळसगाव, आरळी, दर्शनाळ, सदलापूर, हत्तीकणबस,खानापूर या गावांमध्ये परिवर्तनाची लाट आली आहे तर सलगर, शिरवळ, सुलतानपूर, दहिटणेवाडी, हालचिंचोळी या गावांमध्ये पुन्हा एकदा गावकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना संधी दिली आहे. बोरगाव दे येथे माजी सरपंच विलास सुरवसे गटाविरुद्ध माजी उपसरपंच मौला पठाण, चन्नप्पा कामशेटटी, श्याम स्वामी गटामध्ये लढत झाली.
या लढतीत अकरा पैकी नऊ जागा या सुरवसे विरोधी पॅनलला मिळाल्या तर केवळ दोन जागा या सुरवसे गटाला मिळाल्या. यात राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रा. प्रकाश सुरवसे हे स्वतःही पराभूत झाले. पालापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी सरपंच शेकप्पा कलकुटगे गटाला पराभवाचा धक्का बसला.या ठिकाणी माजी सरपंच बाबन जमादार यांच्या पॅनलने सात पैकी पाच जागा जिंकत वर्चस्व मिळवले. सरपंच पदामध्येही त्यांनी बाजी मारली. बोरेगाव मध्ये माजी सरपंच उमाकांत गाढवे यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला. या ठिकाणी गौरीशंकर स्वामी यांच्या पॅनलचा विजय झाला. नऊपैकी पाच जागा या गाढवे यांना तर स्वामी गटाला चार जागा मिळाल्या. शिरवळवाडी ग्रामपंचायतमध्ये तिरंगी लढत झाली होती. या ठिकाणी राजकुमार हननुरे गटाने सत्ता मिळवली.या गटाला चार जागा आणि सरपंच पद मिळाले. हनुमंत घोदे गटाला तीन जागा मिळाल्या. एका जागेसाठी पार्वती दर्शनाळे व उषाबाई हत्तरगी यांना १७७ अशी समान मते मिळाली. चिठ्ठीत घोदे गटाच्या उमेदवाराला कौल मिळाला.
शिरवळ ग्रामपंचायतचे निवडणूक तशी एकतर्फी झाली. कारण या ठिकाणी भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे आणि जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब बिराजदार हे दोन्ही गट इतिहासात पहिल्यांदा एकत्र आले होते. त्यामुळे बिराजदार यांचा विजय सोप झाला.त्यामुळे सरळ सरळ तानवडे – बिराजदार गटाची सत्ता त्याठिकाणी आली आहे. सुलतानपूरमध्ये सत्ताधारी मल्लिकार्जुन स्वामी गटाने सरपंच पदासह पाच जागा जिंकत विरोधी राजू मोरे गटाला धक्का दिला. मोरे गटाला केवळ दोन जागा मिळाल्या. कोन्हाळी ग्रामपंचायत निवडणुकीत राजकुमार पाटील गटाविरुद्ध चिदानंद उन्नद गट उभा होता या ठिकाणी उन्नद पॅनलने बाजी मारली. यात पाटील व माजी सरपंच बाबूराव बनसोडे यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला.सलगर ग्रामपंचायतची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. यात शिवराज बिराजदार, अशोक पाटील यांच्या गटाविरुद्ध चंद्रकांत कालीबत्ते, संजय डोंगराजे- प्रवीण शटगार -काशिनाथ कुंभार – इकबालशेठ बिराजदार या दोन गटामध्ये लढत झाली.यापूर्वी या ठिकाणी काँग्रेसच्या गुंडरगी गटाची सत्ता होती. ती कायम राहिली आहे प्रभाग तीन मध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ कुंभार यांच्या पराभवासाठी मोठे प्रयत्न झाले. अखेर ७२ मतांनी अतिशय अटीतटीच्या लढतीत ते विजय होऊन पॅनलला मदत केली. अंकलगे येथे दुरंगी लढतीत वैशाली कोळी गटाविरुद्ध वैजयंता बिराजदार गटात लढत झाली.
या ठिकाणी कोळी यांच्या पॅनलने नऊ पैकी नऊ जागा जिंकत सरपंच पदावरही बाजी मारली. आंदेवाडी (ज) येथे धोडमनी गटाने विजय संपादन केला.या गटाला पाच जागा तर विरोधी सोनकांबळे गटाला दोन जागा मिळाल्या. सरपंच धोडमणी गटाचा झाला. नाविदगी येथे पंडित चव्हाण गटाने बाजी मारत चौडप्पा वडडे गटाचा पराभव केला. दहा जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या होत्या एका जागेसाठी या ठिकाणी निवडणूक पार पडली.
घोळसगावमध्ये तिरंगी लढत झाली. यात महालिंग शिरगुरे गटाच्या राजशेखर किवडे यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीत बाजी मारली. सुरेश कोतले गटाला तीन जागा, आप्पासाहेब किवडे गटाला तीन जागा तर शिरगुरे गटाला तीन जागा मिळाल्या. उत्तर भागातील आरळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती.या ठिकाणी हांडगे आणि काळे गटाला पराभवाचा धक्का बसला. विनोद सगट गट सरपंच पदाच्या लढतीत बाजी मारला.सगट गटाला चार, हांडगे गटाला दोन आणि काळे गटाला तीन जागा मिळाल्या. दर्शनाळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यापूर्वी संजय स्वामी यांच्या गटाची सत्ता होती. त्या गटाचा यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम बिराजदार गटाने पराभव केला.
या निवडणुकीत बिराजदार गटाने बाजी मारत परिवर्तन केले. चार जागा बिनविरोध झाल्या होत्या. तीन उर्वरित तीन जागा पैकी बिराजदार गटाने दोन तर स्वामी गटाने एक जागा जिंकली. दहिटणेवाडीत रोहित जाधव यांच्या पॅनल विरुद्ध बलभीम माने यांचे पॅनल उभे होते या ठिकाणी सात पैकी चार जागा जिंकत रोहित जाधव यांच्या पॅनलने सरपंच पदावर कब्जा मिळविला तर विरोधी माने गटाला दोन जागा मिळाल्या. सदलापूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तिरंगी लढतीत शिवानंद पटणे यांच्या पॅनलने सरपंच पदासह चार जागा जिंकत गावामध्ये वर्चस्व प्रस्थापित केले तर विरोधी बनसोडे गटाला तीन जागा मिळाल्या. सागर कुंभार यांच्या गटाला या ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले.
हत्तीकणबस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नऊ पैकी सहा जागा या श्रीशैल माळी गटाला तर भाजपच्या श्रीशैल नंदर्गी गटाला केवळ तीन जागा मिळाल्या.या ठिकाणी देवेंद्र बिराजदार व श्रीशैल माळी यांच्या गटाचा सरपंच विजयी झाला. रुददेवाडी ग्रामपंचायतीच्या लक्षवेधी लढतीत दोन सदस्य यापूर्वीच बिनविरोध झाले होते पाच जागांसाठी निवडणूक लागली होती या ठिकाणी सत्ताधारी आणणाराव करवीर गटाला पराभवाचा धक्का बसला तर भाजपच्या अरविंद ममनाबाद यांनी चार जागा जिंकत गावामध्ये वर्चस्व निर्माण केले. करवीर गटाला तीन जागा मिळाल्या. पंधरा वर्षानंतर या ठिकाणी सत्तांतर झाले.
खानापूर ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी चार जागा या बसवराज कोळी यांच्या गटाला तर सैपन पटेल गटाला दोन जागा मिळाल्या परंतु सरपंच मात्र पटेल हे झाले. हालचिंचोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दुरंगी लढतीत मानव घोडके यांच्या पॅनल विरुद्ध सिद्धाराम मणूरकर हा गट उभे होता. या ठिकाणी सत्ताधारी घोडके गटाने बाजी मारत सात पैकी सात जागा जिंकून विरोधी पॅनलचा धुव्वा उडविला.
गावनिहाय विजयी सरपंच व उमेदवार याप्रमाणे –
दर्शनाळ : सुनिल बिराजदार (सरपंच), सदस्य : अदिल बिराजदार, गुलशन चौधरी, प्रियंका माने, श्रीशैल व्हनमुर्गे.
सलगर : ज्योती डोंगराजे (सरपंच), सदस्य : यशोदाबाई चव्हाण, रेवण्णा म्हेत्रे, महानंदा पोतेनबाद, परशुराम भगळे, परवीन बिराजदार, शांताबाई झिंगाडे, काशिनाथ कुंभार, पार्वती पाटील, समरीन बिराजदार, चंदव्वा शेळके, अमोगसिध्द पुटगे, गुंडप्पा कोळी, निकीता धसाडे.
खानापूर : सैपन पटेल (सरपंच), सदस्य : खंडप्पा बसरगी,महानंदा मडसनाळ, लक्ष्मीबाई बसरगी, सुधाकर आंदेवाडी, सुनिता बनसोडे, महादेवी बिराजदार.
हालचिंचोळी : श्रीशैल माशाळे (सरपंच), सदस्य : सागर खांडेकर, शालुबाई बनसोडे, नागम्मा संभुभैरे, श्रीशैल माशाळे, भुताळी संभुभैरे, रुकसाना नागुरे, विक्रम जमादार, कलावती मणुरे.
कोन्हाळी : चिदानंद उण्णद (सरपंच), सदस्य : दिलीप गायकवाड, प्रतिका बनसोडे, वैशाली बनसोडे, मल्लिनाथ ढब्बे, मलम्मा हिरेमठ, कमलाकर जाधव, मंगल वाघमारे, नागाबाई पाटील.
अंकलगे : वैशाली कोळी (सरपंच), सदस्य : शोभा कोळी, भारता साबणे, संगीता साबणे, इरेशा मांग, बसवराज कोळी, अशोक जाधव, शिवशरण विजापुरे, सावित्री कोणदे, सुनंदा पुजारी.
रुद्देवाडी : तुकाराम पाटील (सरपंच), सदस्य : यशवंत शेरी, श्रीदेवी कोतली, भिमबाई हिरोळी, लक्ष्मीबाई शिंगे, काशिनाथ पाटील, लक्ष्मीपुत्र जमादार, सुस्मिता शाखापुरे.
हत्तीकणबस : श्रीशैल माळी (सरपंच), सदस्य : श्रीशैल गायकवाड, पद्मावती म्हेत्रे, संगम्मा बिराजदार, शिवानंद मेळकुंदे, रेश्मा धडके, परव्वा पाटील, संतोष नंदर्गी, गुरप्पा उण्णद, संगीता हिरापुरे.
आंदेवाडी ज : जगदेवी धोडमनी (सरपंच), सदस्य : रुकमोद्दीन नदाफ, ज्योती कलमनी, शिवम्मा जमादार, संजय पुजारी, रियाना मुजावर, कस्तुरी सोनकांबळे, सिधाबाई पुजारी.
घोळसगाव : राजशेखर किवडे (सरपंच), सदस्य : लक्ष्मण आजुरे, सलीमाबी फकीर, ताराबाई गायकवाड, प्रदिप कोतले, शशिकला सुतार, इंदुबाई गायकवाड, बालाजी कांबळे, राचव्वा स्वामी, पार्वती पालापुरे.
शिरवळवाडी : स्नेहा शहाणे (सरपंच), सदस्य : हणमंत घोदे, पार्वतीबाई दर्शनाळे, रुकिया होटगी, श्रीशैल स्वामी, निर्मला होदलुरे, सुर्यकांत शहाणे, उषादेवी हत्तरकी.
सदलापूर : शिवानंद पटणे (सरपंच), सदस्य : लक्ष्मण भोसगी, अनिता कोरे, हाफिजा शेख, साखरुबाई बनसोडे, मंगल घोडके, सुनिल बनसोडे, राजश्री भोसगी.
दहिटणेवाडी : स्वाती जाधव (सरपंच), मोहन सुरवसे, आरती सुरवसे, नागिणी शिंदे, शिवलिंगप्पा व्हनचेंजे, छबुबाई जाधव, गंगाराम कदम, नागाबाई व्हनचेंजे.
बोरेगांव : जगदेवी स्वामी (सरपंच), सदस्य : नवनाथ जग्गे, विजयालक्ष्मी चिकलंडे, सिध्दाराम माने, उमाकांत गाढवे, रेश्मा औरसंग, कलप्पा आलुरे, शांताबाई जांभळे, गौराबाई बंडगर.
सुलतानपूर : मल्लम्मा स्वामी (सरपंच), सदस्य : विनोद बोरकर, सुशिला इटकर, मल्लम्मा स्वामी, वषर्ज्ञ होटकर, वैजिनाथ काळे, निर्मला पाटील.
अरळी : अजय सकट (सरपंच), दस्य : अतुल काळे, सुरेखा धुम्मा, शहजाद चौधरी, प्रकाश हांडगे, इंदुबाई गायकवाड, खाजामा कलिखान, गामाजी इरसंग, सुरेखा स्वामी, केसरबाई कुंभार.
पालापूर : बाबन जमादार (सरपंच), सदस्य : संतोष जगताप, कस्तुरा कलकुटगे, फरीदा जमादार, अंकुश देडे, छायाबाई पाटील, मलय्या बिळंबे, विठाबाई जगताप.
बोरगाव दे : विद्या स्वामी (सरपंच), सदस्य : अब्दुल पठाण, गिरजाबाई बिराजदार, बाळकृष्ण बनसोडे, श्रीकांत जिरगे, बेगम नदाफ, अविनाश बंदीछोडे, रुपाली जिरगे, मदार जमादार, जयश्री गावडे, महानंदा व्हदरगुंडे.
नाविंदगी : पंडित राठोड (सरपंच), सदस्य : चंद्रकांत फुलारी, महानंदा तंबाके, मुतप्पा तंबाके, प्रभावती पवार, शरणप्पा गायचोडे, मुबारक मुल्ला, स्वाती जवळगी, भाग्यश्री थारु, शेटप्पा दुर्ग, इनजातबी बागवान, शालुबाई राठोड.
शिरवळ : आशाबाई बिराजदार (सरपंच), सदस्य : हमीदा पठाण, मलकव्वा पाताळे, रुपाली गायकवाड, कांताबाई निंबाळे, मंगलाबाई थोरात, पुजा कवडे, सत्यभामा कोरे, निर्मला तानवडे, मनिषा जोगदनकर, शैलजा माने-पाटील, मनिषा दुधभाते आदी उमेदवार विजयी झाले आहेत.
काँग्रेसचा १६ तर भाजपचा
१७ ग्रामपंचायतीवर दावा
मतदार संघातील २६ पैकी पालापूर, नाविदगी, बोरेगाव, आंदेवाडी(ज), सलगर, शिरवळवाडी, दर्शनाळ, हत्तीकणबस, घोळसगाव, हालचिंचोळी, सदलापूर, आरळी या बारा तर दक्षिणमधील आचेगाव, रामपूर, धोत्री, तोगराळी चार अशा १६ ग्रामपंचायतीला काँग्रेसने वर्चस्व मिळवल्याची माहिती माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.भाजपने स्वतंत्र पत्रकार परिषद घेत तालुक्यातील २० पैकी सुलतानपूर, आरळी, दर्शनाळ, नाविदगी, सदलापूर,शिरवळ, शिरवळवाडी,बोरगाव दे, अंकलगे, रुददेवाडी, कोन्हाळी, दहिटणेवाडी, हालचिंचोळी, घोळसगाव या चौदा तर दक्षिण मधील दर्गनहळळी, गंगेवाडी, तोगराळी यातील अशा १७ ग्रामपंचायतीवर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील गटाने वर्चस्व मिळवल्याची माहिती तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड यांनी दिली.
शिंदे गटाचे तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी तीन ग्रामपंचायतीवर तर रिपाईच्या अविनाश मडीखांबे यांनी एका ग्रामपंचायतीवर सत्ता आल्याचा दावा केला आहे.