नवी दिल्ली : देशासाठी पुन्हा चिंताजनक बातमी आहे. भारतासह जगभरात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने देशासाठी पुढील 40 दिवस महत्त्वाचे आहेत. कारण जानेवारीमध्ये भारतात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू शकतात असा दावा केला जात आहे.
आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व आशियाला कोरोनाचा तडाखा बसल्यानंतर 30-35 दिवसांनी भारतात साथीची नवीन लाट आल्याचे यापूर्वीही आढळून आले होते. हा एक ट्रेंड यापूर्वी देखील दिसून आला आहे. मात्र, संसर्गाची तीव्रता कमी असल्याचेही त्यात म्हटले आहे. कोरोनाची लाट आली तरी मृतांचा आकडा आणि बाधित रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी असेल.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोना रुग्णसंख्येत वाढ रोखण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक देखील घेतली. कोरोनाच्या ओमिक्रॉन सबव्हेरिएंट बीएफ.7 मुळे झाली आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की BF.7 च्या प्रसाराचे प्रमाण खूप जास्त आहे आणि एक संक्रमित व्यक्ती 16 लोकांना संक्रमित करू शकते