सचिन पवार
कुरनूर,दि.८ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त कुरनूर मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब चौधरी यांनी दिली आहे. दि.८ रोजी सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मूर्ती स्थापना होईल.त्यानंतर दि.१० रोजी कोरोना काळामध्ये योगदान दिलेल्या आशा सेविकांचा सन्मान होणार आहे.त्यानंतर प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्ताचा तुटवडा पाहून भव्य रक्तदान शिबिर ही आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करून योगदान द्यावे असे आवाहन अध्यक्ष चौधरी यांनी केले आहे.आहे.त्यानंतर मुख्य दिवस दि.१२ रोजी दरवर्षी प्रमाणे जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण होऊन या जयंतीची सांगता होईल.
सामाजिक उपक्रमाची परंपरा कायम…!
दरवर्षी आरजे प्रतिष्ठानच्यावतीने अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवत असतो. लोकहितासाठी कोणते कार्यक्रम आयोजित करता येईल त्या त्या पद्धतीचे कार्यक्रम आत्तापर्यंत आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनावश्यक खर्चाला आळा घालून अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबवला तर लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. त्यामुळे गेली सात वर्षापासून ही परंपरांची कायम आहे. यापुढे देखील अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रमाची परंपरा कायम राखू.
विश्वजीत बिराजदार,अध्यक्ष राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान