ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चुंगी प्रशालेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात

कुरनूर : श्रीमती धोंडूबाई स्वामी माध्य. व उच्च माध्य. प्रशाला चुंगी येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अतिशय उत्सा पडला. चुंगी प्रशालेच्या मैदानावर सन २०००-२००१ च्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता.अध्यक्ष स्थानी निवृत्त शिक्षक हरिश्चंद्र कासार होते. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व विद्यादेवता सरस्वती प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी स्व. शिवाजी कटारे, स्व. मुकुंद मोरे, स्व.उत्तम काजळे, स्व. रामचंद्र चव्हाण आदी दिवंगत कर्मचाऱ्यांना व शशिकला साळुंखे अमोल कांबळे शिवाजी कांबळे सौदागर फडतरे आदी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली व मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. मेळाव्यास ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व माजी विद्यार्थी आपली नोकरी, व्यवसाय, राजकारण, समाजकारण, शेती आदी उद्योगधंद्यात प्रामाणिक व चिकाटीने काम करीत आहोत. असे मनोगत व्यक्त केले. प्रत्येकाने आपल्या वर्गातील जुन्या आठवणीला उजाळा दिला.

सर्व शिक्षकांच्या अध्यापनाची आठवण काढली. ‘शाळेत असताना शाळेचे महत्त्व वाटत नाही’. पण आज आम्हाला खूप शाळेत यावेसे वाटते, मज्जा करावीशी वाटते, आम्ही कितीही मोठे झालो, यशस्वी झालो तरी आम्ही विद्यार्थीच आहोत. ‘गुरुविना ज्ञान तोकडेच आहे.’ आम्ही शाळेला व गुरुना कधीही विसरू शकत नाही. आमच्या यशाचे मानकरी आमचे गुरुच आहेत. गुरूंचे ऋण कधीच फिटत नाहीत. असे मनोगत व्यक्त करताना सर्व विद्यार्थ्यांचा कंठ दाटून आला होता.

तानाजी बोरकर, विठ्ठल जोगदे, शिवाजी राठोड, गोविंद चव्हाण, दत्ता कोळी, वैभव कोळी, स्वामीराव खंदारे, वैशाली मोरे, उमा काजळे, अंजली पवार, सोनाली वर्दे, वैशाली वर्दे आदी ३५ विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी निवृत्त शिक्षक जगन्नाथ धर्मसाले, अर्जुन गायकवाड, वसंत मोरे, मीनाक्षी मोरे, सुमन कंदले आदी शिक्षक तसेच प्रशालेचे मुख्य. किरण गायकवाड, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईश्वर पवार, बालाजी माने, ज्ञानेश्वर जगताप, अमोल काजळे, ज्ञानेश्वर काजळे, ज्ञानेश्वर कोराळे आदींनी परिश्रम घेतले. वर्षाराणी मोरे यांनी सूत्रसंचालन तर राहुल साळुंखे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!