दुधनी दि. ११ : दुधनीचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेला श्री शांतलिंगेश्वर विरक्त मठ दुधनी यांच्या आश्रयाखाली श्री. म. नि. प्र. डॉ. शांतलिंगेश्वर महायस्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक १३ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेच्या निमित्ताने धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. मात्र जनावरांच्या गड्डा रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी यांनी दिली आहे.
सोलापूरसह राज्यात लम्पी चरमरोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे शासनाने जनावरांचा बाजार भरविण्यास व वाहतुकीस बंदी घातली आहे. पशुधनावारील लम्पी चर्मरोगामुळे जनावरांच्या बाजार भरविण्यास शासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्याने जनावरांचा बाजार भरणार नाही मात्र धार्मिक विधी व इतर कार्यक्रम ठरलेल्या दिवशी वेळेवेर पार पडतील अशी माहिती त्यांनी दिली.
या यात्रेतील धार्मिक कार्यक्रम पुढील प्रमाणे – शुक्रवार १३ जानेवारी नंदीध्वज व श्री लिंगास तैलाभिषेक (यणीमज्जन ) – शनिवार १४ जानेवारी, नंदीध्वज मिरवणूक, सम्मतीभोगी – सम्मती कट्ट्यावर सम्मती वाचन, अक्षता समारंभ. रविवार १५ जानेवारी, श्री मल्लिकार्जुन पालखी, नंदीध्वज मिरवणूक, मकर संक्रांत, होम कट्ट्यावर होम पूजा विधी, होम मैदानावर होमप्रदीपन सोहळा. सोमवार १६ जानेवारी- नंदीध्वज मिरवणूक, होम मैदानावर शोभेचे दारूकाम, रात्री गायन कार्यक्रम, मंगळवार १७ जानेवारी, प्रसिद्ध मल्लांच्या कुस्त्या नंतर रात्री गायन कार्यक्रम होणार आहे. जनावरांचा गड्डा रद्द करण्यात आले आहे तरी दुधनी शहर आणि पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी आपले जनावरे गड्डा परिसरात आणून बांधू नये असे आवाहन यात्रा कमिटीच्यावतीन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस मलकाजप्पा अल्लापुर, गिरामल्लप्पा सावळगी, सातलिंगप्पा परमशेट्टी, सिद्धाराम मल्लाड उपस्थित होते.