अक्कलकोट ता.११ महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर महामंडळातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय लोकाभिमुख आदर्श पत्रकार पुरस्कार अक्कलकोटचे पत्रकार चेतन जाधव यांना सांगली येथे शिक्षकेत्तर महामंडळाच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी राज्य अधिवेशनात मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. पत्रकारितेमध्ये शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल महामंडळातर्फे राज्यातील पाच पत्रकारांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो.
महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळाचे ५० वे सुवर्ण महोत्सवी राज्य अधिवेशन सांगली येथील कर्नाळा रोडवरील धनंजय गार्डन येथे झाले. व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी,शिक्षक आमदार जयंत आसगावकर,माजी खासदार तथा ब्रिगेडियर सुधीर सावंत,माजी आमदार भगवानराव साळुंखे,रावसाहेब चोपडे,प्रताप पाटील,शिक्षकेतर संघटनेचे राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर,प्रदेश अध्यक्ष अनिल माने,विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे, खंडेराव जगदाळे,राज्य उपाध्यक्ष श्रीशैल तळवार,सांगली जिल्हाध्यक्ष मकरंद कुलकर्णी,जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे,कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर आदी मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पत्रकार चेतन जाधव यांना सन्मानचिन्ह,शाल व बुके देऊन लोकाभिमुख आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्हाध्यक्ष रविकांत सुर्वे,सचिव मुस्ताक शेतसंदी,कोषाध्यक्ष महेश रामशेट्टी,अक्कलकोट येथील विकास तळवार,वसंत आरेनवरू,धर्मराज आरबळे,विकास नडगिरे,हनमंतराव पाटील,तालुका सचिव चंद्रकांत हरळय्या,अनिल देशेट्टी,ए.एल. मकानदार आदीसह अनेक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राज्यस्तरीय लोकाभिमुख आदर्श पत्रकार पुरस्कार पत्रकार चेतन जाधव यांना मिळाल्याबद्दल माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे,आमदार सचिन कल्याणशेट्टी,दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले,वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, बाळासाहेबांची शिवसेना चे तालुकाध्यक्ष संजय देशमुख,ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब निंबाळकर,मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुदेश कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.