ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशात शैक्षणिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षण देणार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

"अलजमीया- तुस - सफीया" अरेबिक शैक्षणिक संस्थेच्या इमारतीचे लोकार्पण

मुंबई, दि.१०: युवा पिढीला पुढे नेणारी धोरण शासनाकडून राबवली जात आहेत. कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये यासाठी शिक्षण धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्व दिले जात आहे असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

अंधेरी मरोळ येथील”अलजमीया- तुस – सफीया” अरेबिक शैक्षणिक संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर चे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, “अलजमीया- तुस – सफीया चे “कुलगुरू डॉ. सय्यदन मुफद्दल सैफउद्दीन,दाउदी बोहरा” समाजाचे शहजादा अलिअसगर कलीम ऊद्दीन,शहजादा कियदजोहर इज इज्जुद्दीन,दाउदी बोहरा” समाज मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थिती होता.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की,”दाउदी बोहरा” समाजाच्या चार पिढी सोबत माझा संवाद आहे.कोणताही समाज वेळेनुसार कसा बदलतो करतो यावरच त्या समाजाचा विकास अवलबंबून असतो.”दाउदी बोहरा” समाज ही काळाप्रमाणे बदलत आहे. काळाप्रमाणे नाविन्यपूर्ण शिक्षणाची वाट धरत आहे. ही गोष्ट आनंदाची आहे.अलजमीया – तूय- सफीयाह ही देशातील दुसरी अरेबिक शैक्षणीक संस्था स्थापन झाली या समाजाचे हे १५० वर्षांपूर्वीचे स्वप्न आज साकार झाले आहे.गुजरात सुरत येथील संस्थेचे माजी कुलपती डॉ. मोहम्मद बुरहानुद्दीन यांचे काम मी पाहिले आहे. नव्या पिढीला शिक्षण देण्यासाठी ते आग्रही होते. सूरत येथे त्यांनी कुपोषण आणि जलसाक्षरता साठी काम केले त्यांची सक्रियता ही ऊर्जा देणारी होती.आजही मला या समाजाच्या आजच्या पिढीकडून आपल्याला प्रेम मिळत आहे.हे प्रेम खूप मोलाचे आहे असेही प्रधानमंत्री म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, “दाउदी बोहरा” समाज बांधव जगाच्या कुठल्याही देशात असले तरी देशाप्रती त्यांचे प्रेम आणि योगदान खूप आहे आणि भविष्यातही राहील. शिक्षण क्षेत्रात “दाऊदी बोहरा” समाजाचे खूप मोठे योगदान आहे. शिक्षणाविषयी स्वप्न पाहिल्यानंतर ते प्रयत्न करून पूर्ण करण्याची क्षमता या समाजामध्ये आहे.”अलजमीया- तुस – सफीया”या अरेबिक शिक्षण संस्थेत महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे ही चांगली गोष्ट आहे. यापुढेही महिलांचा विकास,आधुनिक शिक्षण महिलांना देण्यासाठी ही संस्था आपले योगदान देईल अशी मला आशा आहे.शासनाकडून युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे राबवली जात आहेत असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य युक्त शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. शिक्षण आणि उद्योग क्षेत्र हे दोन्हीही पूरक असले पाहिजे अशी धोरणे राबवत आहोत.”दाउदी बोहरा” हा उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे. या उद्योजकांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.उद्योगासाठी कर प्रणाली मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.शासनाच्या धोरणामुळे नोकरी देणारे तयार होत आहेत.विकास करत असताना हे शासन वारसा आणि आधुनिकता बरोबर घेवून पुढे जात आहे.देश पारंपारिक संस्कृतीला आधुनिकतेची जोड देण्यात येत आहे. सण – उत्सवाना आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. जुन्या ग्रंथांना डिजिटायझेशन केले जात आहे. सरकार पर्यावरणावर काम करत आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करत आहे. जी ट्वेंटी चे अध्यक्ष पद भारताला मिळालेला आहे हा मोठा बहुमान आहे.”दाउदी बोहरा” समजातील प्रत्येक नागरिक जो जागतिक पातळीवर आहे तो आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचे नाव पुढे नेईल अशी आशा व्यक्त करतो असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले.

यावेळी “अलजमीया- तुस – सफीया ” शैक्षणिक संस्थेची माहितीवर आधारित ध्वनी चित्रफित दाखवण्यात आली.”दाउदी बोहरा” समाजाच्या स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

“अलजमीया- तुस – सफीया “शैक्षणीक संस्थेविषयी

अलजमीया- तुस – सफीया “शैक्षणीक संस्था मुंबई अंधेरी येथील मरोळ येथे गेल्या दहा वर्षापासून सुरू केली आहे. या संस्थेच्या शैक्षणीक शाखा कराची, सुरत , नैरोबी येथे आहेत.या संस्थेच्या वतीने अंधेरी येथे पाच इमारतीचे बाधकाम करण्यात आले असून एका इमारतीमध्ये महिला वसतिगृह हॉस्टेल व दुसऱ्या इमारतीमध्ये मुलांचे वसतिगृह चालू केले आहे. या संस्थेमध्ये कला, विज्ञान, वाणिज्य व कुराण या विषयी मुलांना शिक्षण दिले जाते. या विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर केम्ब्रीज विद्यापीठ आणि अलिगड विद्यापीठ येथे पुढील शिक्षण घेण्यासाठी शिक्षण ग्राह्य धरले जाते.वयाच्या १३ व्या वर्षापासून या शैक्षणिक संस्थेमध्ये मुले व मुली शिक्षण घेतात. शिक्षण घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या पदवी पदवी शिक्षणा समशिक्षण गणले जाते. त्यानंतर अलीगढ़ विद्यापीठामध्ये विद्यार्थी पी.एच. डी.करू शकतात. एकूण ५०० च्या आसपास विद्यार्थी शिकत असून 20 शिक्षक कर्मचारी व 30 शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!