अक्कलकोट, दि.११ : सी.बी.खेडगी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग व दयानंद कला शास्त्र महाविद्यालय,सोलापूर अर्थशास्त्र विभाग सामंजस्य करार अंतर्गत एक दिवशी केंद्रीय अंदाजपत्रक २०२३-२४ या विषयावर कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पावर मार्गदर्शन करण्यात आले.प्रारंभी या कार्यशाळेची सुरुवात जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्रराज्य राज्यगीताने झाली. यावेळी केंद्रीय अंदाजपत्रक प्रबोधन व मार्गदर्शन भित्ती फलकाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराय आडवितोट व दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी एच दामजी तर प्रमुख पाहुणे म्हणून एस. आर. हिरेमठ, डॉ. महादेव खराडे,बाजार समितीचे सचिव मडीवळप्पा बदोले यांची उपस्थित होती. याप्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक डॉ. गणपतराव कलशेट्टी यांनी केंद्रीय अंदाजपत्रकाच्या फलकाच्या माध्यमातून व अंदाजपत्रकीय साहित्यातून विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान स्पर्धात्मक व अनमोल असे आहे, असे मत व्यक्त केले. या संस्थेचे चेअरमन खेडगी यांनी केंद्रीय अंदाजपत्रक उपयुक्तता आर्थिक विकास व सामाजिक कल्याण पायाभूत क्षेत्रात करण्यात येणारी गुंतवणूक देशाची उत्पादन व उत्पन्न शक्ती इत्यादी बाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले.
हिरेमठ यांनी केंद्रीय अंदाजपत्रक २०२३-२४ या वर्षातील प्रत्येक क्षेत्रासाठी करण्यात आलेली भरीव अशी आर्थिक तरतूद व भविष्यातील प्रगती कृषी क्षेत्र उद्योग सेवा बाजारपेठ संशोधन रस्ते व रेल्वे बँकिंग क्षेत्र बांधकाम क्षेत्र ग्रामीण व शहरी विकास शैक्षणिक क्षेत्रातील आर्थिक बदल ऊर्जा निर्मिती पायाभूत सुविधा पर्यटन क्षेत्र आंतरराष्ट्रीय व्यापार आयकरातील बदल इत्यादी बाबत अंदाजपत्रकातील बारकावेसह परिपूर्ण असे मत मांडले.या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रमुख मार्गदर्शक डॉ. महादेव खराडे यानी अंदाजपत्रक व अर्थव्यवस्था यामधील सूक्ष्म समग्र आर्थिक तरतुदी व भविष्यातील अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकासाचा वेग याबाबत सर्वकश सांख्यिकीय मत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य आडवीतोट यांनी केंद्रीय अंदाजपत्रकातील सुधारित खर्चाची आकडेवारी व अंदाजपत्रक हा अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा पायाभूत घटक असल्याचे मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य. बी एच दामजी यांनी या कार्यशाळेस संस्था महाविद्यालयाकडून शुभेच्छा दिले. कार्यशाळेच्याआयोजनासाठी संशोधक व तांत्रिक मार्गदर्शक म्हणून डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेत कला वाणिज्य शास्त्र विभागातील विद्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विकास भारतीय व प्रा.रमेश धोत्रे यांनी केले. कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.