कुरनूर : आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांकरिता घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा NMMS (नॅशनल मिन्स कम मेरीट स्कॉलरशिप इयत्ता आठवीं)च्या परीक्षेसाठी बसलेल्या एकुण सात विद्यार्थ्यांपैंकी महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था, अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्यमिक प्रशालेच्या दोन विद्यार्थिनी कु. करिश्मा ईलाई जमादार (सुलतानपुर) हिने ७८.३०टक्के व कु. समिक्षा दिगंबर बाबर(गुळहळ्ळी) हिने ७७.२३टक्के गुण मिळवून शिष्यवृत्ती करिता पात्र ठरल्या.
या विद्यार्थिनींचे व यांना ज्यादा तास घेऊन मार्गदर्शन केलेल्या विज्ञान सहशिक्षिका व शिष्यवृत्ती परीक्षा विभाग प्रमुख स्वप्नाली जमदाडे, सहशिक्षिका मल्लप्पा चप्पळगाव, सहशिक्षक विश्वनाथ चव्हाण सर, शहाजी माने सर यांचे संस्थेचे अध्यक्ष व आमदार माननीय सचिनदादा कल्याणशेट्टी, संस्थेचे जेष्ठ संचालक आदरणीय मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व मार्गदर्शक सन्माननिय सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संस्थेच्या संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, उपसरपंच सागरदादा कल्याणशेट्टी, संस्थेचे संचालक मल्लिकार्जुन मसुती, संस्थेच्या सी.ई.ओ. रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख पुनम कोकळगी, सुरेखा कल्याणशेट्टी विद्यालयाचे प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी, मुख्याध्यापक विलास बिराजदार, पर्यवेक्षक अशोक साखरे यांनी अभिनंदन केले.