खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल
नाशिक : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिक येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे गटातील मोठ्या नेत्यावर दाखल करण्यात आलेला हा पहिला गुन्हा आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी राज्यात झालेल्या सत्तसंघर्षावरून उद्धव ठाकरे यांचावर टीका केली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत जहरी टिका केली होती. दरम्यान, संजय राऊतांनी भाजपसह शिंदे गटातील नेत्यांचा समाचार घेतला. याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचावर टीका केली.
काल निवडणूक आयोगाच्या निकालामुळे ठाकरे आणि शिंदे गट यातील वाद आता विकोपाला गेला आहे. अशातच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावरून उद्धव ठाकरे यांचावर टीका केली होती. याच टीकेला उत्तर देतांना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. यामुळे शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.