ध्यास विश्वसार्ह बातमीचा

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीची धाड ; लक्ष विचलित करण्याच्या हेतूने छापेमारी – बघेल

छत्तीसगड : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीची धाड पडल्याच वृत्त आहे. ईडीच्या धाडी संदर्भात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्वतः ट्वीट करून माहिती दिली आहे. बघेल यांच्यासह छत्तीसगड प्रदेश काँग्रेस समितीचे कोषाध्यक्ष, पक्षाचे माजी उपाध्यक्ष आणि एका आमदाराच्या घरावरही ईडीने छापेमारी केल्याचं बघेल यांचं म्हणणं आहे.

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे होणाऱ्या काँग्रेसच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही धाड पडली आहे. ‘अशा प्रकारे धाड टाकून आमच्या हिमतीला तुम्ही तोडू शकत नाही. भारत जोडो यात्रेचं यश आणि अदानी समूहाची पोलखोल झाल्याने निराश भाजपने फक्त लक्ष विचलित करण्याच्या हेतूने ही छापेमारी केल्याचा आरोप बघेल यांनी केला आहे. ‘हा देश सत्य काय ते जाणतो, आम्ही लढणार आणि जिंकणार’, असा विश्वासही त्यांनी या ट्वीटमधून व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!