चेंबूर येथील एका कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सोनू निगमला ठाकरे गटाच्या एका आमदार पुत्राने केली धक्काबुक्की
मुंबई : प्रसिद्ध गायक सोनू निगम याला त्याच्या चेंबूर येथील कार्यक्रमात ठाकरे गटाच्या एका आमदार पुत्राने धक्काबुक्की केली. त्याच्या शोमधील कलालकर मंडळी सोबत हुज्जत बाजी करून त्यांना स्टेजवरून खाली फेकल्या प्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातेरपेकर यांच्या माध्यमातून चेंबूर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सोनू निगमच्या संगीत गाण्यांचा लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोनू निगम हा गाण्याचे सादरीकरण करून स्टेजवरून खाली येत असतांना सोनू निगम सोबत सेल्फी घेण्यासाठी उपस्थित लोकांची झुंबड उडाली. यात ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातेरपेकर यांचा मुलगा स्वप्निल फातेरपेकर याने सोनू निगम सोबत धक्काबुक्की केली.
स्वप्नील फातेरपेकर हा सोनू निगम सोबत फोटो काढन्यासाठी जबरदस्ती करत होता. त्याला नाही म्हटल्याने त्याने हा हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकरणी मध्यरात्री सोनू निगमने चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सोनू निगमच्या तक्रारीनंतर आमदार प्रकाश फातेरपेकर यांचा मुलगा स्वप्निल फातेरपेकरच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहेत.