मुंबई : बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी उत्तरे छापून आल्याचे उघडकीस आल्यानंतर आता काल बुधवारी झालेल्या हिंदीच्या प्रश्न पत्रिकेतही चुका झाल्याचे समोर आले आहे. दोन प्रश्नांमध्ये चुकीचे क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे पेपर सोडवताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.
इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकल्याचे समोर आले होते. असाच प्रकार बुधवारी झालेल्या हिंदीच्या पेपरमध्ये झाला. प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. मात्र, या शब्दांचे क्रमांक 1, 2, 1, 2 असे देण्यात आले आहेत. ते 1, 2, 3, 4 असे असा यला हवे होते. तर चार समानार्थी शब्द लिहण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना 1, 1, 1, 1 असे क्रमांक देण्यात आले आहेत. हे 1, 2, 3, 4 असे असायला हवे होते.