ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उसाला गरज असतानाच खत-पाणी द्या, अक्कलकोट येथील जय हिंद शुगरच्या कार्यक्रमात कृषि तज्ञ डाॅ.अमोल पाटील यांचा सल्ला

अक्कलकोट, दि.२५ : अलीकडे बहुसंख्य शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की,उसाला अधिक पाणी दिल्यास उसाच्या उत्पादनात वाढ होईल.परंतु यंदा सर्वाधिक पाऊस होऊन ही उसाच्या उत्पादनात घट झाली आहे.म्हणून शेतकरी बांधवांनो उसाला गरजेपुरतेच खत आणि पाणी देऊन स्मार्ट शेती करा,असा सल्ला कृषि तज्ञ डाॅ.अमोल
पाटील यांनी दिला.शनिवारी,अक्कलकोट तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या घटलेल्या उस उत्पादनावर उपाययोजना म्हणून आचेगांव ( ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरच्यावतीने वागदरी रोडवरील शरणमठ येथे सुवर्ण कृषी एकरी शंभर टन उस उत्पादन
तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत तालुक्यातील उस
उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी डाॅ.पाटील बोलत होते.यावेळी जयहिंद शुगरचे मुख्य कार्यकारी संचालक बब्रुवान माने-देशमुख,व्हाईस चेअरमन विक्रमसिंह पाटील,पंचायत समिती माजी सभापती महेश जानकर,व्यवस्थापकीय संचालक आर.पी देशमुख,शेट्टेप्पा पराणे,बसवराज लोंढे,गोरखनाथ पाटील,शिवराज
बिराजदार,शंकर पाटील,कल्याणी गंगोडा,प्रभुलिंग उण्णद,रमेश फुलमणी आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे
बोलताना डाॅ.पाटील म्हणाले की,यंदा सरासरी एकरी फक्त ३२ टन उस उत्पादन मिळाले आहे.उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न मात्र कमी मिळाल्याने उस उत्पादक शेतकरी यंदा हतबल झाला आहे.म्हणून जमिनीचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी पिक पध्दतीत बदल करुन,ठिबक सिंचनाचा वापर करु ,दोन सरी मध्ये योग्य अंतर ठेऊन , पारंपरिक पध्दतीत बदल करुन उसाला गरज असतानाच खत-पाणी देऊन कमीत कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्यासाठी सध्या स्मार्ट शेती करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी सुवर्ण कृषी उस तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत अति पाउस व अवर्षण परिस्थितीमध्ये ही जमिनीच्या क्षमतेत वाढ करून रासायनिक खतांचा स्पिलीट पध्दतीने वापर व ईएम
व डी कंपोजर व पीआयबीटेन या निवीष्ठाद्वारे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढ करून कमीत कमी खर्चात एकरी शंभर टन ऊस उत्पादन तंत्र शेतकरी बांधवांना डाॅ.पाटील यांनी समजावून सांगितले.जयहिंद शुगरच्या मार्फत पाच हजार एकर वर फेब्रुवारी व मार्च महिन्यात उस रोप लागवड करून या शेतकऱ्यांना वर्षभर बांधावर जाऊन तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती जयहिंद शुगरचे मुख्य कार्यकारी संचालक बब्रुवान
माने-देशमुख यांनी दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बी.पी तोरणे तर उपस्थितांचे आभार गजानन वढणे यांनी मानले.यावेळी शेतकी अधिकारी जेऊरे,बी.पी तोरणे आदींसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!