ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बंधारे दुरुस्त करा, कालव्यांची स्वच्छता त्वरित करा आ. सुभाष देशमुख यांच्या सूचना ; जपसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतली आढावा बैठक

सोलापूर : दक्षिण सोलपूर मतदारसंघातील सिंचन कामे, पर्यटन स्थळ व तिर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठक जपसंपदा विभागाचे अधिकाऱ्यासमेवत आमदार सुभाष  देशमुख यांनी घेतली. यावेळी आ.देशमुख यांनी भीमा-सीना जोड कालवा, बंधारे दुरुस्ती, कालवा स्वच्छता, प्रस्तावीत वडापूर बॅरेजसह अन्य ठिकाणचे बॅरेज, संरक्षक भिंती व घाट बांधणे , होटगी तलाव व कुंडल संगमचा पर्यटनस्थळ विकास यावर प्राधान्याने चर्चा करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

दक्षिण सोलपूर मतदारसंघातील भीमा व सीना नदीवर बांधण्यात आलेले को.प.बंधारे  दगडी बांधकामातील आहेत. याच्या पायातून  गळती होत असल्याने 34-80 स्तंभांची कामे नव्याने कॉक्रीटमध्ये करण्याची शासनाकडे मागणी केली असून त्याचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत, पाणी अडविण्यासाठी वापरात असलेले लोखंडी बर्गे गंजून खराब झाले, त्यासाठी  लोखंडी बर्गे  नविन पुरवठा संदर्भात आढावा घेऊन त्वरीत पुरवठा करावा, दोन्ही नद्यांच्या  घाट व संरक्षक पुरसंरक्षक भिंती बांधण्याची शासनाकडे मागणी केली असून त्याचेही प्रस्ताव लवकर पाठवावेत, देगांव जलसेतूचे रेल्वेमार्गावरील काम  जूनअखेर कामपूर्ण करून  कालव्यातून खरीप हंगामात चाणी सोडून चाचणी घेण्याचे नियोजन करावे,   उजनीचे शाखा कालवा दुरुस्ती व स्वच्छता करावी,  यांत्रिकी विभागाची मशिनरी वापरून विशेष मोहीम हाती घेऊन एप्रिल अखेर  कालवे स्वच्छ करावेत, दबलेले आणि खचलेले भराव मजबूत करावेत, सीतामाई तलव भरण्यासाठी केलेल्या कालव्यावर मुख्यद्वार उभारणीचे कामास ४० लाख मंजूर असून निविदा निश्चित झाली असलेने दोन महिन्यान काम पूर्ण करावे, भंडारकवठे गावास  असणाऱ्या पुरसंरक्षक बांधाची रुंदी व उंची वाढवावी, याला ४ कोटी  खर्च येईल, एवढा निधी जि.प.कडून शक्य नसलेने हे काम लाक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करावे, तसा  शासनास प्रस्ताव सादर करावा,  दक्षिण तालुक्यात भीमा सीना नदी वाह रहावी म्हणून सन २०१४ पासून सततच्या पाठपुराव्यामुळे या भागातही भीमा -सीना जोड कालव्यास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळावे,  पुढील अधिवेशनापूर्वी अंदाजपत्रक तयार करून शासनास सादर होईल असे नियोजन करावे,

होटगी तलाव परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करायचा आहे त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. ही बाब विचारात घेऊन जलसंपदा विभागाने तातडीने पर्यटन विभागास ना हरकत प्रमाणपत्र द्यावे,  हत्तरसंग-कुडल संगम येथील देवस्थान तिर्थक्षेत्र पर्यटन केंद्र म्हणून विकासीत करण्यासाठी  जलसंपदा विभागाने बंधारा व घाट बांधण्याची अंदाजे किंमत तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागास कळवावी, यासह विविध सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या बैठकीस लोकमंगल बँकेचे संचालक इंजि. प्रसाद कांबळे,  जलसंपदा विभागाचे धीरज साळे,  कार्यकारी अभियंता नारायण जोशी, रमेश वाडकर, मोहन जाधवर, स्नेहाल गावडे, पाटकर, फरीद मुजावर व प्रकाश बाबा यांच्यासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!