अक्कलकोट : शहरा लगत असलेल्या अक्कलकोट ते मैंदर्गी रोडवरील राहुल रुही यांच्या शेतातील भंगार गोडऊनला अचानकपणे आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. ही घटना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. यात सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.
शहराजवळ असलेल्या मैंदर्गी रस्त्यावर राहुल रुही यांची शेतजमीन आहे. त्याठिकाणी देवानंद घोळसगाव यांनी भाडेतत्त्वावर काही गुंठा जागा गोडाऊनसाठी घेतली होती. त्यामध्ये स्प्रिंकलर पाईप सह अनेक प्रकारचे भंगार साहित्य होते. त्या गोडाऊनला सोमवारी दुपारी अचानकपणे आग लागली होती. यानंतर एकच धावपळ उडाली. याची माहिती कळताच रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथून नगरपालिका मुख्याधिकारी सचिन पाटील यांना कळवताच सोबतीला शाखा अभियंता मलय्या स्वामी, सफाई कर्मचारी बालाजी पारखे, अमित बनसोडे यांच्यासह १४ कर्मचारी अग्निशामक गाडी घेऊन आग विझविले. तो पर्यंत त्या गोडाऊन मधील सर्व प्रकारचे साहित्य जाळून खाक झाले होते.
घटनास्थळी माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, अजय मुकणार, प्रतीक बनसोडे,सुरेश गायकवाड, उदय सोनकांबळे, विपुल कडबगावकर, संतोष कुंभार, प्रकाश गायकवाड, राजीव भगळे, पुटटूराज मडीखांबे, मुबारक कोरबू, संदीप मडिखांबे, प्रदीप मडिखांबे, प्रशांत मडिखांबे,गौतम मडिखांबे, स्वामी शिंदे वकील मडिखांबे, पांडू घाटगे आदींनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.