ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी भारताकडून कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या

नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांदरम्यान प्रथम तीन सामन्यांची वनडे त्यानंतर टी-२० आणि मग कसोटी मालिका खेळली जाणार आहे.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे २७ नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. या मालिकेत विराट कोहली कोणत्या ११ खेळाडूंना संघात संधी देणार आहे ते जाणून घेऊयात…

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित ओव्हरच्या मालिकेत रोहित शर्मा खेळणार नसल्याने त्याच्या जागी शिखर धवनसोबत केएल राहुल सलामीला येण्याची मोठी शक्यता आहे. राहुलला संघाचा उपकर्णधारही बनवण्यात आले असून तो मालिकेत विकेटकीपरची देखील भूमिका बजावेल. कर्णधार विराट कोहली तिसऱ्या तर श्रेयस अय्यर चौथ्या स्थानावर फलंदाजी करेल. तर, पाचव्या स्थानासाठी शुभमन गिल आणि मनीष पांडे यांच्यामध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा संघातील ऑल-राउंडर खेळाडू असतील. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी हे तीन वेगवान गोलंदाजी विभाग सांभाळतील, तर युजवेंद्र चहल एकमेव फिरकी गोलंदाज असेल.

पाहा पहिल्या वनडेसाठी भारताचा संभाव्य संघ

शिखर धवन, केएल राहुल (विकेटकीपर), विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे/शुभमन गिल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ

आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशाने, एलेक्स कॅरी (विकेटकिपर), मार्कस स्टायोनिस, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, एडम जम्पा आणि जोश हेजलवुड

वनडे मालिका

१) पहिली वनडे- २७ नोव्हेंबर, सिडनी

२) दुसरी वनडे- २९ नोव्हेंबर, सिडनी

३) तिसरी वनडे- २ डिसेंबर, मानकुआ ओव्हल

टी-२० मालिका

१) पहिली टी-२०: ४ डिसेंबर, मानकुआ ओव्हल

२) दुसरी टी-२०: ६ डिसेंबर, सिडनी

३) तिसरी टी-२०: ८ डिसेंबर, सिडनी

कसोटी मालिका

१) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट

२) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न

३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी

४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!