ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खासदार संजय राऊत यांच्या ‘’त्या’’ वादग्रस्त विधानवरून शिंदे-फडणवीस गटाचे आमदार आक्रमक

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात प्रसार माध्यमाशी संवाद साधताना एक वादग्रस्त विधान केली आहे, त्या विधानवरून शिंदे- फडणवीस गटाचे आमदार विधान मंडळात आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांच्या विरोधात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.

विधिमंडळ नाही हे चोरमंडळ आहे. ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे, असे वादग्रस्त विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे विधानभवनातही तीव्र पडसाद उमटले. संजय राऊत म्हणाले, आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार आहे का? आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पदे दिली आहेत. आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे परत येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, अशी टीका त्यांनी केली.

हक्कभंग प्रस्ताववावर बोलताना कॉँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हणाले की, विधिमंडळाला चोर मंडळ आहे म्हणणे हे चुकीचे आहे. शब्दाचा वापर सर्वांनी राखून केला पाहिजे. विरोधिपक्ष नेते अजित पवार म्हणाले की, कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला अशा पद्धतीने चोर मंडळ म्हणायचा अधिकार नाही. याची शहानिशा करायला हवी. जर ती व्यक्ती तसे बोललेली असली तर त्यांना व्यवस्थित मेसेज देण्याचे काम केले पाहिजे. असे अजित पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!