ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीने लावला सुरुंग ; कसब्यात महाविकास आघाडीच्या धंगेकरांचा दणदणीत विजय

पुणे : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा दणदणीत पराभव केला आहे. धंगेकर यांनी रासने यांचा 11040 मतांनी पराभव केला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावला असून, धंगेकरांच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

कसब्यामध्ये कोण बाजी मारणार यासाठी पैजा लागल्या होत्या आणि सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे कसब्यात काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राज्यात नवे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत झाली होती.

कसबा पेठ निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची करीत या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, आमदार, माजी नगरसेवकांचा फौजफाटा प्रचारात आणला होता. मात्र, दांडगा जनसंपर्क आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असणारे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यापुढे भाजपला आवश्यक ते वातावरण निर्माण करता आले नाही. निवडणुकीत मतदारांच्या ओठी केवळ धंगेकर यांचेच नाव होते

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!