मुंबई : समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघात मोठ्या प्रमाणावर घडत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही समृद्धी महामार्गावरील अपघातचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची मागणी केली. नेहमी काही ठिकाणी अपघात का होतात, याची तपासणी करण्याची मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार असल्याची माहिती दिली.
बुलढाणा जिल्ह्यात अलीकडे झालेल्या अपघातामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात सख्ख्या बहिणी, त्यांची नात, मुलगा, दोन्ही सुना यांचा समावेश होता. या अपघाताचा मुद्दा विधानसभेत गाजला.