दुधनी दि. १५ : येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था संचलित रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाला. बालगोपाळांनी देशभक्तीपर, कोळी गीत व मराठी लावणी नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. बालगोपाळांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे, असे एस. जी. परमशेट्टी हायस्कूलचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय हिळ्ळी यांनी यावेळी सांगीतले.
कार्यक्रमाचे सुरुवात विदयेची देवता सरस्वती माता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक सिद्धाराम येगदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकाश करवीर, नागेश गुरुभेट्टी, सोमशेखर रेवतगाव, दत्तात्रय यंकंची, शाळेचे सदस्य राजकुमार हिप्परगी, तिप्पण्णा मानकर, शांतलिंग परमशेट्टी यांच्यासह पालकवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मल्लिनाथ कोळी, शिक्षिका सुनंदा इंगळे, भाग्यश्री कोळशेट्टी, सना नागणसुर, विद्या जमादार, विजयालक्ष्मी हिरेमठ, शंकर हंगरगी, रत्नप्पा गोटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी करडे तर आभार महादेव हूळ्ळी यांनी मानले.