वॉशिंग्टन : चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले. अमेरिकेसह अनेक देशात या व्हायरसने कहर केला आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत लाखो अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर रुग्णांची संख्या ही सहा कोटींच्या वर गेली आहे.
दरम्यान, अमेरिकेत कोरोना व्हायरसचा पुन्हा उद्रेक झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे तब्बल 1.80 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे 2296 लोकांचा मृत्यू झाला. याआधी 20 नोव्हेंबर रोजी 2.04 प्रकरणं समोर आली होती. तर भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने देखील 92 लाखांचा टप्पा पार केला आहे.