ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बागेश्वर बाबाच साईबाबांविरोधात वादग्रस्त विधान, ‘’त्या’’ विधानाचा शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी केला निषेध

शिर्डी : बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री हे एका मागून एक वादग्रस्त विधान करत आहे. याआधी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त केला होता. आता यानंतर त्यांनी साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाचा शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी निषेध केला असून धिरेंद्र शास्त्रीने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबा यांना देव मानण्यास नकार दिला आहे. साईबाबा हे संत होऊ शकतात, ते फकीर होऊ शकतात पण ते देव होऊ शकत नाहीत. गिधाडाचं चामडं पांघरून कुणी सिंह होत नाही, असं विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. शिर्डी ग्रामस्थांनी त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. एका विशिष्ट विचारसरणीचे लोक साईबाबांविषयी नेहमीच अशी वक्तव्ये करत असतात. साईबाबा देव आहेत की नाही? यासाठी धीरेंद्र शास्त्रीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. धिरेंद्र शास्त्रींनी एकदा साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत यावे त्यांची अक्कल ठिकाणावर येईल; अशा भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

साईबाबांनी त्यांच्या हयातीत वैदिक परंपरा जपल्या. त्यामुळे साईसंस्थाकडून साई मंदिरात आजही वैदिक परंपरा जपल्या जातात. साईबाबांना नावं ठेवणारी अनेक लोकं आजपर्यंत आली गेली. मात्र आम्ही बाबांच्या शिकवणूकीप्रमाणे चालतो. धिरेंद्र शास्त्रीने महाराष्ट्राची संत परंपरा समजून घ्यावी आणि साईभक्तांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करू नये, असा सल्ला साईमंदिराचे सेवानिवृत्त पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी धिरेंद्र शास्त्रीना दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!