ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान मोदींचा शनिवारी पुणे दौरा; कोरोना लस निर्मात्या ‘सीरम’ला देणार भेट

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्याच दिवशी ते सिरम इन्स्टिट्यूला भेट देणार आहेत. दुपारी 1 ते 2 या दरम्यान मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीच्या निर्मितीबाबत माहिती घेतील.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर 4 डिसेंबरला 100 देशांचे राजदूत सिरम इन्स्टिट्यूट आणि हिंजवडीतील जिनेव्हा बायोटेक कंपनीला भेट देणार आहेत .यानंतर कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहेत.

दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे. त्याचाच भाग असलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केली जाणारी कोविडशिल्ड ही लस अंतिम टप्प्यात असल्याचं सिरमचे अदर पुनावाला यांनी सांगितलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर आहे

असा असेल पंतप्रधानांचा पुणे दौरा…

28 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजून 25 मिनिटांला अहमदाबाहून पुणे विमानतळावर आगमन होईल. विमानतळावरूनच ते थेट सीरम इनस्टिट्यूटला हेलिकॉप्टरनं रवाना होतील. दुपारी 1 वाजून 05 मिनिटं ते 2 वाजून 05 मिनिटं या एक तासांच्या कालावधीत ते सीरम इनस्टिट्यूटला भेट देतील. संबंधित अधिकाऱ्यांकडून कोरोना लसीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतील. नंतर ते पुन्हा विमानतळाकडे रवाना होतील. दुपारी 2 वाजून 45 मिनिटांला पुणे विमानतळावरून तेलंगाणाकडे रवाना होतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!