अक्कलकोट बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील;चप्पळगावचे आप्पासाहेब पाटील उपसभापती
अक्कलकोट दि.१५ : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांची तर उपसभापतीपदी अप्पासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली.या निवडीमुळे सभापती पाटील यांना दुसऱ्यांदा अक्कलकोट बाजार समितीचे सभापतीपद मिळाले आहे. येथील बाजार समितीच्या कार्यालयात सभापती व उपसभापती पदासाठी सकाळी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये सभापती पदासाठी पाटील यांचा एकमेव अर्ज होता तर उपसभापती पदासाठी मात्र सत्ताधाऱ्यांकडून आप्पासाहेब पाटील व बसवराज माशाळे यांचा अर्ज दाखल केला गेला तर विरोधकांकडून कार्तिक पाटील यांनी अर्ज भरला होता. यात माशाळे यांचा व्यापारी मतदार संघातून अर्ज आल्याने तो
अर्ज बाद ठरला.त्यानंतर कार्तिक पाटील व आप्पासाहेब पाटील यांच्यामध्ये या पदासाठी लढत होऊन आप्पासाहेब पाटील यांना सर्वाधिक १२ मते मिळाली त्यामुळे पाटील यांची उपसभापतीपदी वर्णी लागली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.जी.झालटे व सहा.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सिध्देश्वर कुंभार यांनी काम पाहिले.प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नूतन पदाधिकाऱ्यांचे आमदार
सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी स्वामी समर्थ साखर कारखाना, अक्कलकोट व दुधनी बाजार समितीच्या नूतन संचालकांचा एकत्रित सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यात सहकार क्षेत्र कार्यरत आहे यापुढेही सहकारामध्ये आपण त्यांच्या सोबत राहु. दुधनी, अक्कलकोट बाजार समिती व कारखान्यात चांगले काम करून दाखवु,
असे ते म्हणाले.नूतन सभापती सिद्रामप्पा पाटील म्हणाले, माझे वय ८५ असले तरी तालुक्यातील जनतेने माझ्यावर खूप मोठा विश्वास दाखवला आहे.या विश्वासाची परतफेड नक्कीच या पुढच्या पाच वर्षांमध्ये करू. आमदार सचिन कल्याणशेट्टी व माझ्यावर तालुक्यातील जनतेने जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही.
याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष संजीवकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना पुढील निवडणुका एकत्रित राहून जिंकू, असे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमात आडत व्यापारी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष बसवराज
घिवारे, उपाध्यक्ष संतोष भंडारे, सचिव मुसा
बागवान यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक महेश हिंडोळे,
कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वनाथ भरमशेटटी, दुधनी बाजार समितीचे सभापती अप्पू परमशेट्टी, उपसभापती सिद्धाराम बाके, मल्लिकार्जुन कारले, मोतीराम राठोड,रमेश कौटगी, भालचंद्र मोरे, संजय याबाजी, दिलीप शावरी, देवेंद्र बिराजदार, श्रीमंत कुंटोजी, निजामोद्दीन बिराजदार, सोपान निकते, उत्तम वाघमोडे, उमेश पाटील, महेश पाटील, संजय बाणेगाव, सुधीर मचाले, अभिजित पाटील, सुरेश झळकी, प्रकाश किलजे, चंद्रशेखर बडदाळे, विवेक ईश्वरकट्टी, प्रभाकर दिंडूरे, शिवमूर्ती विजापुरे, रविंद्र बगले, विठ्ठल यमाजी, डॉ.शरणु काळे, पिरोजी शिंगाडे, मोहन दुलंगे, महेश पाटील, शरणु मसुती, अशोक वर्दे, सोमनाथ पाटील, शंकर उणदे, संतोष भंडारे, उमाकांत शटगार, संतोष माशाळे, गिरमल गंगोंडा यांच्याह दोन्ही बाजार समितीचे नूतन संचालक, साखर कारखाना संचालक, सोसायटी चेअरमन, संचालक, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक व सूत्रसंचलन आणि आभार मल्लिनाथ
दुलंगे यांनी मानले.
पाटील घराण्याला
तिसर्यांदा संधी
अक्कलकोट बाजार समितीवर सिद्रामप्पा पाटील यांना दुसर्यांदा संधी मिळाली आहे त्यांचे पुत्र संजीवकुमार पाटील यांना मागच्या वेळी संधी मिळाली होती.संजीवकुमार पाटील हे साखर कारखान्याचे अध्यक्ष झाल्यामुळे सिद्रामप्पा पाटील यांना या ठिकाणी पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
चपळगावच्या पाटील
यांना दुसऱ्यांदा संधी
अप्पासाहेब पाटील यांना दुसर्यांदा संधी दिली गेली आहे. पाटील हे सिद्रामप्पा पाटील यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.मागच्या वेळी ते उपसभापती म्हणून कार्यरत होते. या निमित्ताने पाटील यांना पिता-पुत्रांसोबत काम करण्याची अनोखी संधी प्राप्त झाली आहे.