ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट समर्थ नगर हद्दीत तीव्र पाणीटंचाई,तब्बल वीस दिवसाड होतोय पाणीपुरवठा,नियोजनच नाही !

 

अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट शहरालगतच असलेल्या समर्थ नगर ग्रामपंचायत तब्बल वीस दिवसांनी पाणीपुरवठा झाल्याने या भागातील नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या असल्याने दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न निर्माण झाला आहे.या भागात पूर्वीपासूनच किमान पंधरा दिवसाड या ठिकाणी पाणीपुरवठा आहे स्वतंत्र पाण्याची व्यवस्था नसल्याने अक्कलकोट शहराच्या पाणीपुरवठा विभागाकडूनच समर्थ नगर ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा केला जातो.काही वर्षांपूर्वी समर्थ नगर ग्रामपंचायत अस्तित्वात आली परंतु अनेक वर्षापासून
या ठिकाणी नवीन पाणीपुरवठा योजना झाली नव्हती दीड वर्षांपूर्वी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे त्याचे कामही सुरू असल्याचे सांगण्यात येते परंतु योजना कधी पूर्णत्वात जाणार आणि प्रत्यक्षात पाणी कधी मिळणार याचे उत्तर कोणाकडेच नाही.सध्या तरी या समर्थ नगर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत प्रत्येकाला पाण्याची गरज आहे असे असताना पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे असलेले पंधरा दिवसाड पाणी देखील वीस ते बावीस दिवसांनी मिळाले आहे याबाबत चौकशी केली असता पाईपलाईन फुटली ,लाईट व्यवस्थित नव्हती अशी मोघम उत्तरे दिले जात आहेत.
समर्थ नगर ग्रामपंचायत म्हणजे अक्कलकोट शहराचा पूर्णपणे हद्द वाढ आहे या हद्दवाढ भागात पाण्याची खूप मोठी अडचण आहे याकडे आता गांभीर्याने कोण पाहणार आणि
पाण्याची समस्या लवकरात लवकर कोण मिटवणार हा देखील खरा प्रश्न आहे.येथील नागरिकांकडून लाखो रुपये पाणीपट्टी व इतर कर घेतला जातो परंतु अत्यावश्यक असलेले पाणी मात्र पंधरा ते वीस दिवसाड दिले जाते.१५ ते २० दिवसात पाणीपुरवठा मिळत असल्याने नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे या भागात नागरिक कसे राहत असतील याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
अक्कलकोट शहरातील तीच अवस्था आहे त्या ठिकाणी देखील सात ते आठ दिवसाड पाणी मिळत आहे अक्कलकोट शहर आणि हद्दवाढ भागाच्या ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर दिसत आहे.याकडे संबंधिताने लक्ष द्यावे अन्यथा नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत दिसत आहेत.

टँकरद्वारे पाण्याची
मागणी का नाही

पाण्याची इतकी मोठी समस्या असताना ग्रामपंचायती टँकर व इतर सुविधांची मागणी का करत नाही.लोकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. मागे अनेक वेळा या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला आहे अजून उन्हाळा जाणार बरेच दिवस बाकी आहेत असे असताना टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांना दिलासा द्यावा,अशी मागणी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!