राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला खणखणीत इशारा दिला आहे. मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही,’ असा जबरदस्त इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्र सरकारला दिला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध ईडीनं केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे.
महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. नुकतंच ही मुलाखत प्रसारित करण्यात आली. या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला.
हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे. तुम्ही कुटुंबियांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. ते काही धुतल्या तांदळाचे नाहीत. त्यांची खिचडी कशी शिजवायची ते आम्हाला माहीत आहे. सूडानेच वागायचं तर आम्हीही वागू शकतो. पण हे विकृत बुद्धीचे चाळे आहेत. त्या मार्गाने जायची आमची इच्छा नाही. आम्हाला भाग पाडू नका,’ असा इशारा मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिला.
‘राजकारण राजकारणासारखं केलं जायला हवं. सत्तेचा दुरुपयोग करून अंगावर येणार असाल तर सत्ता सदासर्वकाळ कोणाकडे राहत नाही. आता आमच्याविरोधात राजकारण करणाऱ्यांवरही केसेस होत्या. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी त्यांना वाचवलं होतं. त्याचं थोडं तरी भान त्यांनी ठेवावं,’ असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान