गुरुपौर्णिमेची अक्कलकोटमध्ये जय्यत तयारी; २३ जून पासून स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात भरगच्च कार्यक्रम
अक्कलकोट : राज्यातील धार्मिक क्षेत्रात नियोजनबध्द मांडणी आणि आखणी असलेल्या सामाजिकतेच्या बरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३६ वा वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक या कार्यक्रमाचे दि. २३ जून ते २ जुलै २०२३ पर्यंत आयोजन करण्यात आल्याची माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिली.
शुक्रवार दि. २३ जून रोजी सायंकाळी ६.३० मिनीटानी कार्यक्रमास प्रारंभ होणार असून अक्कलकोट विरक्त मठाचे श्री म.नि.प्र. पूज्य बसवलिंग महास्वामीजी, प.पू.श्री मोहन पुजारी – मुख्य पुजारी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट, डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले –विश्व फौंडेशन शिवपुरी अक्कलकोट, वे.शा.सं.श्री अण्णू महाराज –पुजारी श्री स्वामी समर्थ समाधी माठ अक्कलकोट, तहसिलदार बाळासाहेब शिरसाट , अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थाचे प्रतिमाचे पूजन, दिपप्रज्वलनाने सदर कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
शुक्रवार दि. २३ जून रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत नक्षत्रांचे देणे, थोर संगित दिग्दर्शक व गायक पद्मश्री पंडीतजी ह्रदयनाथ मंगेशकर, राधा मंगेशकर आणि सहकारी मुंबई यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. शनिवार दि. २४ जून रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘भावभक्ती गीतांजली’ लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते सौ. प्रतिभा थोरात व सहकलाकार पुणे यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
रविवार दि.२५ जून रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘स्वर आर्या’ एक भाव मैफिल, सादरकर्ते –आर्या आंबेकर आणि सहकारी मुंबई यांचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार दि.२६ जून रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘शिवरंजनी’ सोलापूर प्रस्तुत ‘अमर लता’ मराठी-हिंदी भाव-भक्तिगीते सादरकर्ते –निर्मिता- समीर रणदिवे, दिग्दर्शक – उन्मेश शहाणे, संकल्पना – शाईवाले व मोहोळकर, निवेदन – माधव देशपांडे यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
मंगळावर दि.२७ जून रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘हास्य संजे’ कन्नड विनोदी कार्यक्रम सादरकर्ते -गंगावती प्रणेश आणि सहकारी कर्नाटक यांचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि.२८ जून रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘किर्तन’ राष्ट्रीय किर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) यांचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार दि.२९ जून रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘व्याख्यान’ विषय – सेवाभाव-अन्नदान व छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर ख्यातनाम व्याख्याते – नितीन बानुगडे-पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. शुक्रवार दि. ३० जून रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘रंग विनोदाचे, रंग सुरांचे’ सादरकर्ते – श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, मेघना एरंडे व गायक- स्वप्नील गोडबोले, योगिता गोडबोले आणि सहकारी मुंबई यांचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार दि. १ जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत स्वामिनी प्रस्तुत ‘हिटस् ऑफ कुमार शानु’ सादरकर्ते –संदीप पाटील आणि सहकलाकार पुणे यांचा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. २ जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सूर भक्तीचे उमटले भक्ती संगीत कार्यक्रम होणार आहे.
गुरूपौर्णिमे निमित्त सोमवार दिनांक ३ जुलै रोजी सकाळी ७ ते ९ पर्यंत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० पर्यंत नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा, सकाळी १० वाजता महानवैद्य सोलापूरचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, संजय शिंदे (पालखी संयोजक लांजा), अशोक बांदल (देणगीदार, खेड शिवापूर, पुणे) यांच्या हस्ते दाखविण्यात येणार आहे.
सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद, दु. ४ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी, आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या मिरवणूकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात अतुल बेहरे पुणे यांच्या नांदब्रम्ह या ढोलपथकाच्या तालात आणि अमोलराजे लेझिम संघाच्या शानदार खेळाने शुभारंभ पुणेचे उद्योगपती विशाल गोखले, श्री शंकर महाराज मठ, पुणे विश्वस्त व ग्रँव्हीटी ग्रुपचे चेअरमन मिहीर कुलकर्णी, जगन्नात उर्फ अण्णा थोरात –अध्यक्ष अखिल मंडई मंडळ पुणे, बाळासाहेब दाभेकर –अध्यक्ष भरत मित्र मंडळ पुणे,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे पवार, सो.म.पा. नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, सो.म.पा. मा.स्थायी समिती चेअरमन व शहर-जिल्हाध्यक्ष (कॉंग्रेस) चेतन नरोटे, सो.म.पा. माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, सो.म.पा.मा.शिक्षण सभापती संकेत पिसे यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
दि. १ जुलै ते ३ जुलैपर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व निवेदन श्वेता हुल्ले या करणार आहेत. तरी सदरच्या कार्यक्रमाचा लाभ महाराष्ट्रासह आणि अन्य राज्य व परदेशातील स्वामी भक्तांनी घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी केले आहे. यंदाच्या वर्षी सदरचे कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचे हे २४ वे वर्ष आहे.
सध्या आषाढी वारी निमित्त दररोज हजारों स्वामी भक्त अन्नछत्र मंडळात येत आहेत. उभी स्वामींची मुर्ती, महाप्रसादगृह, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, वाटिका व बालोउद्यान, शिवचरित्र धातू शिल्प प्रदर्शन हे पाहण्यासाठी स्वामी भक्तांची मोठी गर्दी होत आहे. यात्री निवास, यात्री भवन, प्रशस्त वहानतळ स्वामी भक्तांनी गजबजलेले व फुलून गेले आहेत.
न्यासाकडून अग्निशामक व रुग्णवाहिकेचा देखील उत्तम सोय केलेली आहे. याबरोबरच तयार केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत ‘पाणी आडवा पाणी जिरवा पाण्याचा अपव्यय टाळा’ पर्यावरणाच्या संतुलनासाठी ‘वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन करा. स्वच्छता अभियान राबवू,’ ‘भारत महाराष्ट्र श्री क्षेत्र अक्कलकोट स्वच्छ करू’ बेटी बचाव, बेटी पढाव’ पाणी हे जीवन, स्त्रीभ्रुण हत्या टाळा, आपला अन्नछत्र स्वच्छ अन्नछत्र हा संदेशामुळे विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. न्यासाला देणगीदारास आयकरात ८० – जी कलमान्वे सवलत आहे.
गुणीजन व गुणवंत
विद्यार्थी पुरस्कार
दिनांक २३ जून ते २ जुलै दरम्यान गुणीजन व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार व सत्कार हे सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
समर्थ महाप्रसाद सेवा
अक्कलकोट शहरातील निराधार, दिव्यांग व गरीब-गरजूंना दैनदिन दोन्ही वेळेचे जेवण डब्यातून पुरविण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आल्या प्रमाणे लाभार्थ्यांच्या पत्त्यावर सदर जेवणाचा डबा दररोज २५० जणांना देण्यात येतो.