ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पीएम किसान योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी गावोगावी शिबिर,तहसीलदारांनी दिली महत्वाची माहिती

 

अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट तालुक्यातील पीएम किसान योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी गावागावात तहसील कार्यालय मार्फत शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली.हे शिबीर ३० जून पर्यंत चालणार असून या उपक्रमानाद्वारे या योजनेतील खूप साऱ्या अडचणी दूर होणार आहे.या योजनेत काही टेक्निकल अडचणी समोर आले आहेत ही वस्तुस्थिती आहे परंतु त्या दूर करण्याचा प्रयत्न आमच्या कार्यालयाकडून सुरू आहे.महाराष्ट्र शासन कृषि पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याकडील शासन निर्णया नुसार कृषी विभाग, महसूल विभाग व ग्राम विकास विभाग यांच्यामध्ये या कामाचे विभाजन केले आहे.पीएम किसान योजनेच्या लँड सिडिंगचे कामकाज महसूल विभागाकडून होणे अपेक्षित आहे त्यामुळे तहसील स्तरावरील नागरिकांच्या अडचणी स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आली आहेत.शिबिरादिवशी संबंधित गावचे तलाठी हे गावाच्या ठिकाणी उपस्थित राहून काही नावात बदल असला तर दुरुस्ती करतील,काही जणांची ई केवायसी पूर्ण नाही
ते पूर्ण करतील.काही जणांचे आधार लिंक नाही.मोबाईल नंबर अपडेट नाही.त्यामुळे अनेक लाभार्थी या अनुदानापासून वंचित
राहत आहेत.शिबिरासाठी गावचे कोतवाल
व पोलीस पाटील हे तलाठ्यांना मदत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व पीएम
किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी लँड सिडिंग संबंधी अडचणीचे निराकरण करून घ्यावे,असे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

तलाठ्यांशी
संपर्क करा

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना
अडचणी कशा निर्माण झाल्या हे अद्याप माहिती नाही परंतु यातील अडचणीची जर आमच्या तलाठ्यांना कल्पना दिली किंवा तक्रार दिली तर ती तात्काळ सोडवू आणि लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा थेट लाभ
मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.

बाळासाहेब सिरसट,तहसीलदार

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!