ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजितदादांच्या अनुभवाचा फायदा शिंदे – फडणवीस सरकारलाही होईल ; गोकुळ परिवाराने केले निर्णयाचे स्वागत

अक्कलकोट,दि.२ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात घेतलेली भूमिका अतिशय योग्य असून त्यांच्या या भूमिकेचा फायदा राज्यातील सहकार,
शेती,कारखानदारी व ग्रामीण क्षेत्राला होणार आहे.या सर्व विषयाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याने शिंदे – फडणवीस सरकारला देखील नक्की होईल,असा विश्वास गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी व्यक्त केला आहे. धोत्री (ता.दक्षिण सोलापूर) येथील कारखाना कार्यस्थळावर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून पवार यांचा शपथविधी होताच गोकुळ परिवाराच्यावतीने एकच जल्लोष करण्यात आला.यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा ठरेल. शेतकरी हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय होतील आणि त्याची अंमलबजावणी होईल.अजित
दादा एक धाडसी नेतृत्व आहे त्यांचा सर्व अधिकाऱ्यांवर एक प्रकारचा प्रभाव आहे आणि आदरयुक्त दरारा आहे.या सर्व बाबींचा सकारात्मक परिणाम विकासावर होईल.
यामुळे सरकारच्या कामगिरीवर देखील पुढच्या काळामध्ये निश्चित असा चांगला परिणाम दिसून येईल.या सरकारमध्ये सामावून घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मी व्यक्तिशः गोकुळ परिवाराकडून आभार मानतो,असेही त्यांनी म्हटले आहे.यावेळी कारखान्याचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर प्रदीप पवार,चीफ इंजिनियर लवटे, चीफ केमिस्ट भावसार, चीफ अकाउंटंट पवार, सिव्हिल इंजिनियर आगरखेड,कार्तिक पाटील,अभिजित गुंड,उमेश पवार,परचेस ऑफिसर
जंगले, ब्रह्मानंद मोटे, अजय कलमदाणे,आनंद कोलते, अशोक कोलते, देवा शिंदे आदींसह कारखान्यातील विविध विभागाचे कर्मचारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!