राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची आज नाशिकच्या येवलयात् जाहीर सभा ; सभेआधी राष्ट्रवादीकडून टीजर रिलीज
नाशिक : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारून काही आमदार आणि खासदार घेऊन राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारमध्ये जाऊन सामील झाले आहेत. या बदल्यात अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद तर त्यांच्या सोबत गेलेल्या इतर नेत्यानं कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देण्यात आले. या बंडात शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचे हात सोडून अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे छगन भुजबळ यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आपल्या राज्यव्यापी दौऱ्याचा शुभारंभ आज येवला येथून करणार आहेत. आपण सर्वजण आदरणीय शरद पवार साहेबांसोबतच आहोत हे पुन्हा एकदा दाखवून देऊयात…
भेटूया आज सायंकाळी ४ वाजता येवला, नाशिक येथे… pic.twitter.com/UZSfJ4d9oA— NCP (@NCPspeaks) July 8, 2023
छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या येवला मतदारसंघात शरद पवार यांची आज पहिली जाहीर सभा होणार आहे. येवला बाजार समितीच्या मैदानावर सायंकाळी ४ वाजता ही सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून शरद पवार राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ येवला येथे फोडणार आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. दोन जुलै रोजी पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन जुलैपासूनच पक्ष बांधणीला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार वयाच्या ८३ व्या वर्षी बाहेर पडणार असल्याचा निर्णय घेतला आहे. आपण आगामी काळात राज्य पिंजून काढणार असल्याचे शरद पवार यांनी मुंबईतील सभेत स्पष्ट केले. शरद पवार राज्यभरात सभा घेणार असून त्याची सुरुवात येवला येथील सभेने करण्यात येत आहे