ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सांगोल्याचा डॉ.संदीप सावंत झाला एमबीबीएस !

 

सांगोला/प्रतिनिधीः
सांगोल्याचा डॉ.संदिप राजेंद्र सावंत याने रशिया देशात पर्म राज्यातील पर्म स्टेट वैद्यकीय विद्यापीठातून एम.बी.बी.एस.पदवी प्राप्त केली.डॉ.संदिप राजेंद्र सावंत याने पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण हैद्राबाद येथे घेतले व त्यानंतर 6 वर्षे एम.बी.बी.एस.पदवी रशिया देशात प्राप्त केली. डॉ.संदिप सावंत याने 2017 साली रशिया देशातील पर्म राज्य वैद्यकीय विद्यापीठात प्रवेश घेतला व 6 वर्षाची एम.बी.बी.बी.एस. चे शिक्षण घेवून पदवी प्राप्त केली. 2017 ते 2023 पर्यंत त्याने 6 वर्षाची एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेवून पदवी प्राप्त केली काल 8 जुलै रोजी पर्म राज्य वैद्यकीय विद्यापीठात विद्यापीठाच्या कुलगुरू मिस.अ‍ॅना सर्गेव्हना ब्लागोनार्व्होवा यांच्या हस्ते डॉ.संदिप राजेंद्र सावंत यास पदवी प्रदान करण्यात आली.  यावेळी प्रमुख पाहुणे नार्थ वेस्टर्न एज्युकेशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमीटेडचे संस्थापक अध्यक्ष डॉ.ज्वेल सय्यद,विद्यापीठाचे डेप्युटी डीन डॉ.विकास सक्सेना, रस एज्युकेशन प्रायव्हेट लिमीटेड दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.वसीम सैद, विद्यापीठाच्या डीन मिस अ‍ॅना निकोलिव्हना, विद्या सावंत यांच्यासह भारतातील व रशियातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, मा.नगरसेवक सतिश सावंत यांचे ते पुतणे आहेत. डॉ.संदिप राजेंद्र सावंत याने 6 वर्षांची एम.बी.बी.एस. ची पदवी प्राप्त केल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन  होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!