ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विरोधी पक्ष शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

मुंबई : १७ जुलै २०२३ : उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर करून शिंदे गटात सामील झाल्याने ठाकरे गट चांगला आक्रमक झाला आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या संवैधानिक पदावर राहून योग्य न्याय करू शकत नाही, त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्यात यावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पहायला मिळाली. विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात सामील झाल्याने विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्यावर अविश्वास दाखवला. आज परिषद सभागृहात नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. हा घटनात्मक पेच सोडवावा यासाठी आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मा. राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. या भेटीत महाविकास आघाडीच्या ४० आमदारांचा समावेश होता. नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावरून हटवा, अशी मागणी आम्ही केली.

विरोधी पक्षनेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेत नीलम गोऱ्हे यांना तात्काळ त्या पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अंबादास दानवे, जयंत पाटील, जयंत पाटील (शेकाप), डॉ नितीन राऊत, एडव्होकेट अनिल परब, सुनील प्रभु, माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थीत होते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!