ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मागितले एकीकडे आणि दिले भलतीकडेच;तलाठी परीक्षा केंद्रावरील सावळा गोंधळ समोर

google.com, pub-1602819151212103, DIRECT, f08c47fec0942fa0

 

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.१७ : गेल्या अनेक वर्षानंतर निघालेल्या तलाठी भरती प्रक्रियेतील सावळा गोंधळ समोर आला आहे. ‘मागितले एकीकडे आणि दिले भलतीकडेच’ असा प्रकार परीक्षेच्या बाबतीत झाला असून यामुळे व्यवस्थेतील गैरकारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.त्यामुळे उमेदवार संतप्त झाले असून यात सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे. राज्यात आजपासून तलाठी भरतीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे . अशात हा गोंधळ झाल्याने उमेदवार चक्रव्ह्यूहात अडकले आहेत.एक तरी अनेक वर्षानंतर ही तलाठी भरती निघाली आहे साधारण राज्यामध्ये ४ हजार ६४४ पदे या माध्यमातून भरली जात आहेत त्यासाठी तब्बल १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज आले आहेत सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यात तर सर्वात कमी वाशिम जिल्ह्यातून आले आहेत २६ जिल्ह्यात २६ केंद्रावरती ही परीक्षा होणार आहे. टीसीएस कंपनीला याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे.
या माध्यमातून तब्बल १० कोटी रुपयांचा महसूल शासनाला जमा झाला आहे.हे सर्व एकीकडे असताना विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी जर सोलापूर ,पुणे ,कोल्हापूर परीक्षा केंद्र निवडले असेल तर त्यांना थेट मुंबई केंद्र देण्यात आलेले आहे.वास्तविक पाहता भरती प्रक्रियेमध्ये असा एक ऑप्शन देण्यात आलेला होता तो म्हणजे आपल्याला कोणत्या परीक्षा केंद्रावरती परीक्षा द्यायची आहे आणि त्याचा प्राधान्यक्रम त्यामध्ये देण्यात आलेला होता अशावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या सोयीनुसार तीन केंद्र निवडलेले आहेत पण
या तिन्ही दिलेल्या केंद्रावर उमेदवारांना केंद्र देण्याऐवजी थेट चौथ्याच केंद्रावरती त्यांना प्रवेशपत्र दिले असल्याने उमेदवारांना धक्काच बसला आहे. त्यामुळे अनेक उमेदवार हे परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही चूक व्यवस्थापनाने वेळीच सुधारून घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. यापूर्वी राज्यात महसूल विभागाच्या भरतीत अनेकदा सावळा गोंधळ समोर आलेला आहे परंतु या तलाठी भरती प्रक्रियेत सुधारणा करून परीक्षा होईल आणि सुरळीतपणे परीक्षा पार पडेल अशी अपेक्षा उमेदवारांना असताना केंद्र निवडीवरूनच गोंधळ समोर आल्याने व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्याच्या दुर्गम भागातून जर एखाद्या विद्यार्थ्याला मुंबईसारखे केंद्र किंवा अन्य अडचणीचे केंद्र जर मिळालेले असेल तर तो विद्यार्थी त्या परीक्षेच्या वेळेत पोहोचणार कसा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे त्याला देखील अनंत अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!