ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सुहासिनींच्या जलकुंभासह प.पू. भरत महास्वामी यांची बैलगाडीतून मिरवणूक,एक लाख एकशे आठ बिल्वार्चन

नागनाथ विधाते

दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर : तालुक्यातील बिरनाळ येथील श्री पूर्णानंद साधक आश्रम येथील प.पू. भरत महास्वामीजी यांची सुहासिनींच्या जलकुंभासह गावातून संवाद मिरवणूक काढण्यात आली.पूर्णानंद मठाचे मठाधिपती प.पू. भरत महास्वामीजी गेल्या एक गेल्या महिन्याभरापासून अधिक मासानिमित्त मौन अनुष्ठानास बसले होते. या श्री श्रध्दानंद स्वामीजींंच्या प्रतिमेचे पूजन करून अनुष्ठान समाप्तीचा कार्यक्रम बुधवारी पार पडला.
सकाळी पहाटे सहा वाजता शिवलिंग रुद्राभिषेक, शिवमहिमा रुद्र पठाण यानंतर प.पू. भरत महास्वामीजी यांच्या मौन अनुष्ठान समाप्तीचा कार्यक्रम महाराष्ट्र- कर्नाटकमधील विविध मठांच्या साधुसंतांच्या उपस्थितीत पार पडला. या मिरवणुकीमध्ये १०१ महिला जलकुंभासह सहभागी होत्या. या बैलगाडीमध्ये प.पू. भरत महास्वामीजी , वसिष्ठ महास्वामीजी बसले होते. याप्रसंगी धनगरी गजढोल गजनृत्य करत सर्वांचे आकर्षण ठरले. यावेळी मातोश्री प.पू. बसमम्माताई, सद्गुरू जनार्दन स्वामी, शिवलोहित स्वामी, सोमलिंग महाराज, सिलीसिद्ध महाराज, प.पू. वसिष्ठ महास्वामीजी, रामचंद्र शास्त्री अण्णा, शिवानंद महास्वामी, यां बालकीर्तनकार वेदांत देशपांडे आदी उपस्थित होते.मंगळवारी रात्री बिरनाळ येथील पूर्णानंद मठांमध्ये कर्नाटकातील
झळकी येथील बिरलिंगेश्वर नाट्यसंघ प्रस्तुत महालिंगरायन महात्मे अर्थात गुरु शिष्य महिमे हे धार्मिक नाटकाचे उद्घाटन जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा सतुबर व भाजप युवा मोर्चाचे मनीष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापकृ अध्यक्ष श्रीशैलमामा हत्तुरे यांच्या हस्ते लक्ष्मी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सोरेगाव येथील डॉ. वैजनाथ कुंभार यांनी स्वखर्चातून साकारणार असल्याचे सांगितले. महात्मा बसवेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीशैलमामा हत्तुरे , कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राधाकृष्ण पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश मळेवाडी, उमेश मळेवाडी, महेश मळेवाडी, उपसरंच श्रीकांत स्वामी, माजी उपसरपंच कांतू पुजारी, राजुर सरपंच लक्ष्मण गडदे,चिदानंद बगले, महेश मळेवाडी, सिध्दाराम पुजारी , शिवानंद वाले, मल्लिकार्जुन पुजारी , पुराणिक चव्हाण, भीमशा सोनकांबळे, शिवगोंडा बिराजदार, शिवरूद्र स्वामी, भीमाशंकर पाटील, पोलीस पाटील निसार अत्तार यांच्या सह परिसरातील नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनगरी गजढोल ठरले
मिरवणुकीचे आकर्षण

पूर्णानंद मठाचे मठाधिपती प.पू. भरत महास्वामीजी गेल्या एक गेल्या महिन्याभरापासून अधिक मासानिमित्त मौन अनुष्ठानास बसले होते. याची सांगता बुधवारी मिरवणुकीने झाली.मिरवणुकीमध्ये १०१ महिला जलकुंभासह सहभागी होत्या. या बैलगाडीमध्ये प.पू. भरत महास्वामीजी , वसिष्ठ महास्वामीजी बसले होते.कर्नाटकातील आलेले धनगरी गजढोल या मिरवणुकीचे आकर्षण ठरले असून एक लाख एकशे आठ बिल्वार्चन अर्पण मंञपठनही ऐतिहासिक ठरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!