जालना घटनेवरून राज्य सरकारची तातडीची पत्रकार परिषद; लाठी हल्ल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी मागितली बिनशर्त माफी
मुंबई : सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे तसेच जालना मराठा समाजावर बांधवांवर पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानुषपणे लाठी चार्ज केला त्याचे तीव्र पडसाद समाजामध्ये उमटले असून राज्यात ठिकाणी आंदोलन सुरू आहेत.या पार्श्वभूमीवर तातडीने मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणी आणि मराठा आरक्षणप्रकरणी सरकारच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.या पत्रकार परिषदेत पोलिसांनी केलेल्या लाठीमारप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिनशर्त माफी मागितली आहे.तसेच लाठीमार करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची देखील भूमिका आहे त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले
आहे. दरम्यान राज्यात आम्ही लाठी चार्ज करण्यास सांगितले अशा प्रकारचा मेसेज वारंवार देण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्ही तिघांनी लाठीमाराचा आदेश दिला, हे सिद्ध करून दाखवा,राजकारण सोडून देऊ,असे आव्हान विरोधकांना दिले आहे.मुंबईत आज
मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक पार पडली.त्यावेळी या सर्व प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.या बैठकीमुळे जालन्यातील घटनेनंतर मराठा आरक्षणाच्या हालचालींना आता वेग आला आहे.यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले,ओबीसी आरक्षणाप्रमाणे मराठ्यांना अनेक तरतुदी लागू केल्या आहेत. सरकार मराठा आरक्षणबाबत अतिशय गंभीर आहे. जालना घटनेवरुन सध्या राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडीने अनेकदा घोळ घातला आहे. हे आरक्षण महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात घालवले आहे.जे नेते मराठा समाजाचा पुळका आला असे दखवत आहेत त्यांनीच आरक्षण घालवले आहे,असा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.अजित पवार म्हणाले,यापूर्वी मराठा समाजाची जी आंदोलन झाली त्याचे देशपातळीवर कौतुक झाले आहे. पण आता गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. आज जी बैठक झाली त्यात सकारात्मक चर्चा झाली. काल मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. लवकरच तोडगा निघेल, मात्र तोपर्यंत शाांतता राखा, असे आवाहन
पवारांनी केले आहे.काही जणांचा आंदोलनांच्या आडून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे,असेही ते म्हणाले.