ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अम्मा सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनच्या दांडिया कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

 

अक्कलकोट,दि.२६ : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त अक्कलकोट शहर व परिसरातील महिलांना त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ अम्मा सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनने तयार करून दिले हे खरोखर कौतुकास्पद आहे,असे मत अक्कलकोट शहरातील इंडियन
मॉडेल स्कूलच्या मैदानात आयोजित दांडिया कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी चपळगावच्या सरपंच वर्षा भंडारकवठे यांनी केले.यावेळी व्यासपीठावर लक्ष्मीताई कवठे,
लीनेस क्लबच्या अध्यक्षा प्रविणा
सोळंखे, अम्मा सुवर्णा-लक्ष्मी फाउंडेशनच्या
अध्यक्षा लक्ष्मी म्हेत्रे, फाउंडेशनच्या सचिवा
शितल म्हेत्रे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका गौरी दातार यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.अम्मा सुवर्णा-लक्ष्मी फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दांडिया कार्यक्रमात अक्कलकोट शहरासह ग्रामीण भागातील युवती व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत मोठ्या उत्साहात पारंपारिक वेशभूषेत दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरण करत आनंद लुटला. या कार्यक्रमात दांडिया, गरबा, सोलो-ड्युएट जनरल दांडिया ,असे गट होते. सर्व प्रकारच्या गटामध्ये महिला व युवतींनी नॉनस्टॉप म्युझिकल लेझर लाईटमध्ये डीजेच्या तालावर बहारदार दांडिया व गरबाच्या नृत्याचे सादरीकरण करत आनंद लुटला.तुबा बागवान, समृध्दी शहा, मनिषा क्षीरसागर, कल्पना हिरेमठ, प्रविणा सोळंखे, पूजा होटकर यांनी क्रमांक पटकाविले. सर्व गटातील विजेत्या स्पर्धकाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख व वस्तु स्वरूपात बक्षीस देण्यात आले.या स्पर्धेचे परिक्षक म्हणून सलोनी शहा, केतकी नखाते, अंजली पडवळकर यांनी काम पाहिले तर दांडिया कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. गणपती वाघमोडे, कृष्णा देशपांडे, दयानंद दणुरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!