मारुती बावडे
अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट तालुक्यात १८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापितांना हादरा देत गावकऱ्यांनी तरुणांना संधी
दिली आहे.यात खास करून शावळ दहिटणे,
रामपूर – इटगे तसेच म्हैसलगे या चार गावांमध्ये तरुणांचे राज्य आले आहे तर करजगी गावांमध्ये मात्र अपेक्षेप्रमाणे
विवेकानंद उंबरजे गटाने विजय संपादन करून या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा रोवला आहे.नन्हेगाव ग्रामपंचायतीवर मात्र काँग्रेसने बाजी मारत माजी सभापती
सिद्धार्थ गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने वर्चस्व मिळवत आपला गड शाबूत ठेवला आहे.तालुक्यात 18
पैकी तळेवाड आणि नन्हेगाव वगळता 16 ग्रामपंचायती भाजपकडे आलेल्या आहेत आणि दक्षिणमध्ये सात पैकी उळे,उळेवाडी आणि तिलहेहाळ या तीन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आले असून एकूण मतदारसंघात 25 पैकी 19 ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळविल्याचे आमदार
सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.तर काँग्रेसकडून 18 पैकी नन्हेगाव,कुडल,तळेवाड या
तीन ग्रामपंचायतीवर पूर्णपणे काँग्रेस तर घुंगरेगाव,केगाव खुर्द,केगाव बुद्रुक या तीन ग्रामपंचायतीवर महाविकास
आघाडी अशा एकूण सहा तर दक्षिणमधील कासेगाव, दोड्डी,औज या तीन ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे.मतदार संघात एकूण 9 ग्रामपंचायतीवर आमचे वर्चस्व आहे.यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत.काही ठिकाणी सरपंचपदाचे उमेदवार थोडक्यात पराभूत झाले आहेत परंतु बहुतांश ग्रामपंचायतीच्या सदस्यांमध्ये मात्र काँग्रेसने वर्चस्व निर्माण केल्याचे माजी मंत्री
सिद्धाराम म्हेत्रे व मल्लिकार्जुन पाटील यांनी सांगितले.सकाळी आठ वाजल्यापासूनच नवीन तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये निकाल ऐकण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. साधारण नऊच्या नंतर एकेक गावचे कल येण्यास सुरुवात झाली.यानंतर विजयी उमेदवारांनी बाहेरच्या बाजूला येऊन गुलालाची मुक्तपणे उधळण करत एकच जल्लोष केला.दहिटणे ग्रामपंचायतीचा निकाल लक्षवेधी ठरला.यात युवा क्रांती स्थानिक आघाडीने प्रस्थापितांना जोरदार धक्का देत गावावर वर्चस्व प्रस्थापित केले.म्हैसलगेमध्ये देखील तोच प्रकार घडला.तळेवाड ग्रामपंचायतीवरही सिद्धव्वा खातीच्या रूपाने काँग्रेसने वर्चस्व मिळवले.शावळमध्ये अनेक दिवसांपासून युवा नेते नितीन चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती या ठिकाणी तिरंगी लढतीमध्ये सोमनाथ तामदंडी व मल्लिकार्जुन नागशेट्टी यांचा पराभव करत चव्हाण हे लकी ठरले.या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला.नितीन चव्हाण हे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कट्टर समर्थक मानले जातात.जकापुरमध्ये सत्ताधारी गटाने वर्चस्व मिळवत आपला गड शाबूत ठेवला आहे.कोर्सेगावमध्ये पोट निवडणुकीत माजी उपसभापती रामचंद्र अरवत गटाचे उत्तम उमदी यांचा पराभव झाला.विजय झालेल्या उमेदवारांनी आपापल्या गॉडफादरकडे जाऊन वर्चस्वाची खुण दाखवीत फोटोसेशन केले व फटाक्यांची आता आतषबाजी केली.भाजपच्या कार्यालयामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या विजयी उमेदवाराचे कौतुक करत अभिनंदन केले तसेच काँग्रेस कार्यालयामध्ये दुधनी बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे,माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील आदींनी आपल्या ताब्यात आलेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.दोन्ही कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
सविस्तर निकाल प्रमाणे : –
शावळ – सरपंच नितीन चव्हाण 365 ,प्रभाग एक – सिद्धाराम पुजारी 277, शरणप्पा तडवळ 330 ,सरस्वती शिवशरण 270, प्रभाग दोन – विनय शिवशरण 258 ,रूपाली पाटील 265, प्रमिला जाधव 270 ,प्रभात तीन- बिरप्पा माळगे 248 ,गंगाबाई राठोड 226, पारूबाई चव्हाण 273
कुडल – सरपंच गुजव्वा जमादार 387, प्रभाग एक – पवन पुजारी 123, इब्राहिम मुजावर 117, प्रभाग दोन – निंगप्पा जमादार 188, कलावती शिवशरण 183, रेवम्मा स्वामी 184, प्रभाग तीन- उमेश चव्हाण 122, जयाबाई बनसोडे 121
करजगी – सरपंच विवेकानंद उंबरजे 2278, प्रभाग एक- रवी लिंबोळे 427, सिद्धू गुजा 470 ,प्रमिला कुंभार 476, प्रभाग दोन – शब्बीर पटेल 666, मोनिका नाईकोडी 647, हिराबाई अनंतपुरे 625, प्रभाग तीन- दस्तगीर गोडीकट 492 ,भीमाशंकर चडचण 492, रेणुका पटेद 485 ,प्रभाग चार – बसवराज कोकणे 388, नागम्मा डबरे 381, स्वाती धसाडे 353, प्रभाग पाच- बसोराज सवळी 403, सुषमा येळमेली 403, मल्लवा नागणसूरे 421,
बिंजगेर – हालहळळी मैं – सरपंच विठ्ठल आरवत 365, प्रभाग एक- भौरम्मा घोडके 176, सुरेखा बिराजदार 128, प्रभाग दोन- देविदास बिराजदार 154 ,जनाबाई कोटी 159, शांताबाई माडबाळ 159, प्रभाग तीन – संतोष धनळळी 192
तळेवाड – सरपंच सिद्धव्वा खाती 622, प्रभाग एक – गजानन हिळळी 235, कस्तुरा करमल 265, निर्मला पाटील 390, प्रभाग दोन- म्हाळप्पा हिळळी 231, भौरममा रायगुंडे 219, प्रभाग तीन -धर्मणा कोटी 196, संगव्वा शिंगे 224
केगाव खुर्द – सरपंच प्रभावती बगले 336, प्रभाग एक- नागेंद्र बगले 153, धानम्मा सुतार 134, राजश्री बिराजदार 161, प्रभाग दोन- इराप्पा हेगरगी 113 ,कमळाबाई चपळगे 104, प्रभाग तीन – संतोष मुडवे 86, सुवर्णा बगले 91
केगाव बुद्रुक – सरपंच श्रीशैल आहेरवाडी 644, प्रभाग एक- अश्विनी गुणापुरे 276, विजयालक्ष्मी दुधनी 268 ,प्रभाग दोन- रमेश देसाई 174, प्रभाग तीन- भीमाशंकर भंडारकवठे 201, सातवा मडनोळी 200
म्हैसलगे- सरपंच सुनील खेड 1191, प्रभाग एक – संतोष माशाळे 264, लक्ष्मीबाई देसाई 254, महादेवी कोळी 286, प्रभाग दोन- मलिकार्जुन बिराजदार 501, अशोक बिराजदार 448, शोभा देसाई 476, प्रभाग तीन – रामचंद्र शिंगे 405, जयश्री माशाळे
342, निंगव्वा औराद 390
कंठेहळळी – सरपंच दिव्या येडे 359
7 जागा बिनविरोध
जकापूर – सरपंच लक्ष्मीबाई वंटे 314, प्रभाग एक- कलावती पुजारी 102, सविता पुजारी 92, प्रभाग दोन – सामबाई मणूरे 117, मल्लवा पाटील 108, प्रभाग तीन- तुकाराम अगतनळळी 94, शरणव्वा करजगी 84
कलकर्जाळ – सरपंच बसलींगव्वा कोडते 529, प्रभाग एक – श्रीमंत ईश्वरकट्टी 177, सिद्धाराम कोळी 186, रूपाली धुळे 185 ,प्रभाग दोन- पंडित ईश्वरकट्टी 203 तमिज पाटील 187, भौरम्मा मैंदर्गी 187, प्रभाग तीन – जगदेवी ईश्वरकट्टी 159, प्रीती ईश्वरकट्टी 165
धारसंग – सरपंच जगदेवी कोळी 243,
प्रभाग एक- नागेश चाबुकस्वार 92, महानंदा कांबळे 100, प्रभाग दोन संतोष पाटील 92, सुनंदा पुजारी 93, प्रभाग तीन – शैलजा नरोणे 60
जेऊरवाडी – सरपंच कमलाबाई राठोड 350, प्रभाग एक- तारू राठोड 161, वृषाली भालेराव 214, मीना जाधव 179, प्रभाग दोन- रोहित भालेराव 218, श्रीदेवी राठोड 191, प्रभाग तीन- विजय भालेराव 123 ,सीताबाई चव्हाण 97
नन्हेगाव – सरपंच रेखा पाटील 528, प्रभाग एक – सुमित गायकवाड 245, श्वेता बंदीछोडे 273, मालनबी चौधरी 266, प्रभाग दोन -कृष्णा खुडे 233, जैनबी पठाण 234, प्रभाग तीन – सिद्रामप्पा मंगरूळे 156, रेखा सोनकांबळे 162
हसापूर- सरपंच तुळसाबाई कामाठी 528, प्रभाग एक- मारुती घटकांबळे 154,सावित्री घटकांबळे 153, प्रभाग दोन- गौतम घटकांबळे 275 ,कृष्णाबाई सदाफुले 251, प्रभाग तीन – गणेश कामाठी 197, मीनाक्षी शिंदे 258
रामपूर इटगे – सरपंच दिलीप कदम 209,
7 पैकी 6 जागा बिनविरोध, प्रभाग एक- शालनबी चेंडके 121
दहिटणे – सरपंच नितीन मोरे 744, प्रभाग एक- मुलुकसाब शेख 212, विकी चौधरी 248, चंद्रकला कांबळे 225,प्रभाग दोन- रखमाजी कांबळे 222 ,शिवशरण कोळशेट्टी 248, सत्यवती कोळी 247, प्रभाग तीन- अंबुताई कटकधोंड 220, शहनाज मुजावर 218, प्रभाग चार – गोपाळ क्षिरसागर 85, संजीवनी चोरमले 96
घुंगरेगाव – सरपंच सुमन गुरव 203, प्रभाग एक – अशोक बनसोडे 63, आंबव्वा बनसोडे 58 ,जयंती माने 60, प्रभाग दोन – सचिन बसरगी 69 ,प्रभाग तीन – सोमनिंग बिराजदार 64, लक्ष्मी बनसोडे 63
पोटनिवडणूक एकूण 2 जागा –
हालहळळी अ – निलपा बिराजदार 158
कोर्सेगाव – सुधाकर उमदी 268
घुंगरेगाव आणि जकापुरमध्ये
चिठ्ठीद्वारे दोन उमेदवार विजयी
जकापूर ग्रामपंचायतच्या प्रभाग तीन साठी अतिशय चुरशीची निवडणूक झाली यामध्ये शरणव्वा करजगी आणि शांताबाई करजगी या दोन्ही उमेदवाराला प्रत्येकी 84 मते पडली परंतु चिठ्ठीद्वारे शरणव्वा करजगी यांनी बाजी मारली. तसेच घुंगरेगाव येथील प्रभाग तीन मध्येही लक्ष्मी बनसोडे आणि सविता बनसोडे यांना प्रत्येकी 63 मते पडली यात चिठ्ठीद्वारे लक्ष्मी बनसोडे या विजयी झाल्या. चिठ्ठीद्वारे या
दोन्ही उमेदवाराच्या गळ्यात विजयाची
माळ पडली.