सखी ग्रुपच्या महिलांनी साजरी केली आगळीवेगळी दिवाळी ;वंचितांना दिल्या छत्र्या आणि दिवाळी फराळाचे साहित्य
अक्कलकोट, दि.९ : समाजसेवेचा वसा घेतलेल्या सुखी ग्रुपने आजपर्यंत आपल्या विविध संकल्पनातून व कार्यकर्तुत्वातून
वेगळी ओळख निर्माण केलेली आहे,असे गौरवोद्गार अक्कलकोटचे श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी काढले.
दिवाळी निमित्त ५१ कष्टकरी लोकांना ऊन वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी छत्र्या व दिवाळी फराळ साहित्याचे वितरण श्रीमंत मालोजीराजे भोसले व जयेश पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.सर्जेराव
जाधव सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला.प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.सखी ग्रुपने दर वर्षाप्रमाणे यंदाही दीपावली सण गरीब, कष्टकरी, होतकरु लोकांसोबत साजरा केला आहे.या वर्षी सखी ग्रूप तर्फे अक्कलकोट परिसरातील भाजीविक्रेते, चर्मकार, रस्त्यावर बसुन साहित्य विकणारे छोटे दुकानदार, कुलूप किल्या दुरुस्ती करणारे आदि कष्टकरी महिला व पुरुषांना ऊन,वारा,पाऊस इत्यादी पासुन संरक्षण व्हावे म्हणून उत्तम प्रतीच्या ८ फुटी छत्र्या व दीपावली फराळ साहित्य देऊन
या कष्टकरी लोकांची दिवाळी सुखकर
केली आहे.
पी पी पटेल फाउंडेशन सोलापूरचे अध्यक्ष जयेश पटेल, सखी अनिता पाटील, लक्ष्मी अचलेर , वेदिका हर्डीकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.उषा छत्रे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सुखी ग्रुपने आजपर्यंत केलेल्या समाजउपयोगी उपक्रमाची व कार्याची माहिती दिली.
सखी ग्रुपने दिलेल्या या मायेच्या छत्रीमुळे या कष्टकरी लोकांचे ऊन पाऊस वाऱ्यापासुन संरक्षण तर होणारच आहे तसेच या गरीब लोकांची कोणीतरी आपुलकीने दखल घेत आहे ही भावना खूप महत्त्वाची आहे,सखी ग्रुपचे हे कार्य कौतुकास्पद आहे,असे पटेल यांनी आपल्या भाषणातून सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सखी ग्रुपच्या मल्लमा पसारे,रेखा तोरसकर,आशा भगरे,अश्विनी बोराळकर,रोहिणी फुलारी,वर्षा शिंदे,श्रद्धा मंगरुळे,डॉ दीपमाला आडवितोट,
रत्नमाला मचाले,शितल जिरोळे,प्रियंका किरनळळी आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा साखरे व माधवी धर्मसाले यांनी केले तर आभार
सोनल जाजू यांनी मानले.